शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

परभणीत पाचव्यांदा होणार शिवसेना-राष्ट्रवादीची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:49 PM

राष्ट्रवादीच्या उमेदवारी घोषणेनंतर आता बोर्डीकरांच्या निर्णयाकडे लक्ष

- अभिमन्यू कांबळे

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असून, पाचव्यांदा हे पक्ष एकमेकांविरोधात लढणार आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसची १९९९ स्थापना झाल्यानंतर पहिल्याच लोकसभेच्या निवडणुकीत माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांनी या पक्षाकडून निवडणूक लढविली होती. याशिवाय काँग्रेसचे रावसाहेब जामकर हेही रिंगणात होते. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार सुरेश जाधव यांनी काँग्रेसचे उमेदवार जामकर यांचा ४३ हजार ६६५ मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादीचे वरपूडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यात आघाडी झाली.

आघाडीतील जागा वाटपानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला. त्यानंतर २००४, २००९, २०१४ अशी सलग तीन वेळा या मतदारसंघात राष्ट्रवादी- शिवसेना अशीच लढत झाली. या लढतीत प्रत्येक वेळी शिवसेनेने राष्ट्रवादीवर मात केली. आता पाचव्यांदा राष्ट्रवादी व शिवसेना एकमेकांविरोधात लढत देत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुलोद सरकारमधील दिवंगत माजी आमदार उत्तमराव विटेकर यांचे चिरंजीव तथा माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर यांना गुरुवारी उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेकडून विद्यमान खासदार संजय जाधव यांचीच उमेदवारी निश्चित आहे. या संदर्भातील घोषणा झाली नसली तरी जाधव यांनी गेल्या वर्षभरापासून या संदर्भातील कामाला सुरुवात केली आहे. २५ मार्च रोजी ते उमेदवारी दाखल करणार आहेत. या निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीकडून कोण उमेदवार रिंगणात उतरणार, यावरही निकालीची गणिते अवलंबून आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचा दबदबापरभणी लोकसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा आहे. शिवाय मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा राष्ट्रवादीकडे आहेत. सेनेकडे केवळ एक विधानसभा मतदारसंघ आहे. भाजपाकडे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. असे असतानाही १९९१ पासून परभणी लोकसभा मतदारसंघावर १९९८ चा अपवाद वगळता सेनेचेच वर्चस्व राहिले आहे. 

बोर्डीकरांच्या निर्णयाकडे लक्षमाजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर या भाजपत असल्या तरी अद्यापही त्या निवडणूक लढविणार असल्याचे सांगत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मात्र तशी शक्यता वाटत नाही. बोर्डीकर मैदानात उतरल्या तर तिरंगी लढत होऊ शकते. त्यातून इतिहासाची पुनरावृत्ती किंवा नवीन इतिहासही घडू शकतो. त्यामुळे बोर्डीकर यांच्या निर्णयाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकparabhaniपरभणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना