पतीस भीती दाखवायला गेली अन् पत्नी जीव गमावून बसली

By ज्ञानेश्वर भाले | Updated: September 22, 2023 19:13 IST2023-09-22T19:12:33+5:302023-09-22T19:13:24+5:30

पती घराबाहेर जाण्यावरून दोघांत झाला होता वाद

She went to show fear to her husband and lost her life | पतीस भीती दाखवायला गेली अन् पत्नी जीव गमावून बसली

पतीस भीती दाखवायला गेली अन् पत्नी जीव गमावून बसली

बामणी (जि. परभणी) : कावीत नवविवाहितेने नवऱ्याला भीती दाखवन्याच्या उद्देशाने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी बामणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

कावीतील लक्ष्मण रामभाऊ काठमोरे व त्यांची पत्नी सायली (वय १९) हे नवविवाहित जोडपे पुण्यात कामानिमित्ताने राहात होते. ते महालक्ष्मी सणासाठी गावाकडे आले होते. गुरुवारी सायंकाळी महालक्ष्मी मांडणे झाल्यानंतर सायली काठमोरे हिला नवरा लक्ष्मण हा गणपतीकडे जातो असा म्हणाला तुम्ही गणपतीकडे जाऊ नका मी फाशी घेईल, असे सायली म्हणाली.  मात्र पती लक्ष्मण यांनी हसत हसत घे फाशी असा म्हणत निघून गेला. सायलीने पतीस भीती घालण्यासाठी घरामध्येच महालक्ष्मीच्या समोरच गळफास गळ्यास अडकविल्याने तिचा त्यातच जीव गेला.

संबंधित घटना कुटुंबियांच्या उशीरा लक्ष्यात आली. घटनास्थळी बामणी पोलीस स्टेशनचे सपोनी कृष्णा घायवट, जमादार सुभाष चव्हाण, जमादार वसंत निळे यांनी पंचनामा करून मयत सायलीचे शविच्छेदन शुक्रवारी जिंतूरच्या शासकीय दवाखान्यात केले आहे. मयत सायलीच्या आई-वडिलांचे जबाब बामणी पोलिसांनी घेतले. त्यामध्ये त्यांनी आक्षेप न घेतल्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: She went to show fear to her husband and lost her life