परभणीत आॅटोरिक्षा अपघातात सात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:49 IST2019-01-06T00:48:38+5:302019-01-06T00:49:00+5:30
दोन आॅटोरिक्षांची समोरासमोर धडक होऊन त्यात सातजण जखमी झाल्याची घटना परभणी- वसमत रस्त्यावर शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

परभणीत आॅटोरिक्षा अपघातात सात जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दोन आॅटोरिक्षांची समोरासमोर धडक होऊन त्यात सातजण जखमी झाल्याची घटना परभणी- वसमत रस्त्यावर शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी- एम.एच.२२- एच २६४१ आणि एम.एच.२२- यू १३८ या आॅटोरिक्षांचा वसमत रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्रासमोर काही अंतरावर अपघात झाला. या अपघातात दोन्ही आॅटोरिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आॅटोरिक्षांमधील काशिनाथ भागोजी (रा.साडेगाव), बापुराव दत्तराव रेंगे (जांब), शारदा ओमप्रकाश अग्रवाल (गणेशनगर परभणी), पद्मा प्रकाश बागडिया (दर्गारोड परभणी), शंकर बापुराव साने (रा.जांब), विठ्ठल सीतारामजी भालेराव (रा.जांब) आणि वैजनाथ तुकाराम रेंगे (रा.जांब) हे सात प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती समजताच ताडकळस पोलीस ठाण्याचे जमादार किशोर नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना परभणी येथील रुग्णालयात हलविले. तसेच घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.