शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकासासाठी १७८ कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 1:35 PM

सोमवारी जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी पाथरी येथे स्थळ पाहणी केली़

पाथरी (जि़परभणी) : साई बाबा यांच्या पाथरी येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी नव्याने १७८ कोटींचा आराखडा तयार केला असून, १४ फेब्रुवारी रोजी मुंबईत हा आराखडा सादर केला जाणार आहे़ तत्पूर्वी, सोमवारी जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी पाथरी येथे स्थळ पाहणी केली़

पाथरी येथील साईबाबा जन्मभूमीच्या विकासासाठी १०० कोटींच्या आराखड्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्यानंतर जन्मभूमी बाबत देशपातळीवर वाद निर्माण झाला होता़ शिर्डीकरांनी त्यास विरोध दर्शविला होता़ त्यानंतर शासनाने पाथरी साईबाबा मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता दिली़  त्या अनुषंगाने आता नवीन आराखडा मंजूर करण्यात आला आहे़  राज्य शासनाने पाथरी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात १४ फेब्रुवारी रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत उच्चाधिकार समितीची बैठक आयोजित केली आहे़ जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर आणि पाथरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर उपस्थित राहणार आहेत़  

टप्प्यात आराखडाप्रशासनाने साई जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला असून तो १७८ कोटी ५१ लाख ६ हजार २१५ रुपयांचा आहे़ त्याचे चार टप्पे करण्यात आले आहेत़ पहिल्या टप्प्यात ६८ कोटी ६५ लाख ६५ हजार २६८ रुपये, दुसऱ्या टप्प्यात ३८ कोटी १४ लाख ३५ हजार ९०३ रुपये, तिसऱ्या टप्प्यात ४० कोटी ६९ लाख ९९ हजार २७८ रुपये आणि चौथ्या टप्प्यात ३१ कोटी १ लाख ५ हजार १०६ रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे़ 

टॅग्स :parabhaniपरभणीsaibabaसाईबाबाpathriपाथरीfundsनिधी