सोनपेठ येथे वाळू माफियाची तलाठी व साक्षीदारास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 16:34 IST2018-07-04T16:33:26+5:302018-07-04T16:34:14+5:30

भिसेगाव शिवारातून अवैध वाळूची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने तलाठी रमेश लटपटे व या प्रकरणातील एका साक्षीदारास मंगळवारी रात्री मारहाण केली.

Sand Mafia beat Talathi and witness in Sonpeth | सोनपेठ येथे वाळू माफियाची तलाठी व साक्षीदारास मारहाण

सोनपेठ येथे वाळू माफियाची तलाठी व साक्षीदारास मारहाण

सोनपेठः तालुक्यातील भिसेगाव शिवारातून अवैध वाळूची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने तलाठी रमेश लटपटे व या प्रकरणातील एका साक्षीदारास मंगळवारी रात्री मारहाण केली. या प्रकरणी आज सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, भिसेगाव शिवारातुन अवैध वाळूची वाहतुक होत असल्याची माहिती तहसीलदार जिवराज डापकर यांनी तलाठी रमेश लटपटे यांना दिली. त्यावरून नायब तहसीलदार गणेश चव्हाण, तलाठी अनील कदम व रमेश लटपटे यांचे पथक भिसेगाव शिवारात गेले. तेथे एक ट्रॅक्टर (क्र. MH-22 AD 2462) अवैधरित्या एक ब्रास वाळूची वाहतूक करत असल्याचे आढळून आले. याचा पंचनामा करत असताना चालक युवराज म्हस्के याने ट्रॅक्टरसह तेथून पळ काढला. 

यानंतर संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास कोरटेक फाट्यावर युवराज म्हस्के याने तलाठी लटपटे व अन्य एक साक्षीदार यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून तलाठी लटपटे यांनी युवराज मस्के व उद्धव यादव यांच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दिली. पुढील तपास सपोनी अमोल पवार हे करत आहेत. 

Web Title: Sand Mafia beat Talathi and witness in Sonpeth