संत गजानन महाराज पालखीचे परभणी जिल्ह्यात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 17:30 IST2019-06-21T17:27:14+5:302019-06-21T17:30:10+5:30
नागरिकांनी पालखीचे जोरदार स्वागत केले

संत गजानन महाराज पालखीचे परभणी जिल्ह्यात आगमन
पूर्णा ( परभणी) : पंढरपूरकडे निघालेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या पालखीचे शुक्रवारी (दि 21) परभणी जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी पालखीचे पूर्णा तालुक्यातील भाविकांनी जोरदार स्वागत केले
पंढरपूर येथील आषाढी यात्रे निमित्त विदर्भातून श्री संत गजानन महाराज यांची पालखी दरवर्षी प्रमाणे पंढरपूरकडे रवाना झाली. शुक्रवारी पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथे दुपारी आगमन झाले. छत्रपती क्रीडा मंडळ व परिसरातील गावकऱ्यांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालखीतील सहभागी वारकरी व भाविकांना अल्पोपहार देण्यात आला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम,दशरथ भोसले, गजानन हिवरे आदींची उपस्थिती होती.