Video:डोक्यावर गमछा, हातात स्टेरिंग; रावसाहेब दानवेंची आमदारांसह दणक्यात ट्रॅक्टरवर सवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 13:29 IST2022-05-07T13:27:49+5:302022-05-07T13:29:03+5:30
ट्रॅक्टर चालवतच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रदर्शन स्थळाला फेरफटका मारला.

Video:डोक्यावर गमछा, हातात स्टेरिंग; रावसाहेब दानवेंची आमदारांसह दणक्यात ट्रॅक्टरवर सवारी
परभणी : येथील संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित संजीवनी कृषी महोत्सवात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी चक्क ट्रॅक्टर चालवून प्रत्यक्ष औजारांची माहिती जाणून घेतली.
येथील संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने ६ जूनपासून राज्यस्तरीय संजीवनी कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ७ मे रोजी या महोत्सवाला भेट दिली. यावे प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला त्यांनी भेट देऊन खत, बियाणे, अद्यावत कृषी औजारे आदींची माहिती घेतली.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी परभणीत चालविले ट्रॅक्टर pic.twitter.com/poXXUIlZY8
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) May 7, 2022
कृषी दालनांना भेट देत असतानाच रावसाहेब दानवे ट्रॅक्टरच्या स्टॉलजवळ पोहचले. तेव्हा ट्रॅक्टरची माहिती घेतल्यानंतर त्यांना ट्रॅक्टर चालविण्याचा मोह आवरता आला नाही. ट्रॅक्टर चालवत त्यांनी संपूर्ण प्रदर्शन स्थळाला फेरफटका मारला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार मेघना बोर्डीकर, प्रदर्शनाचे संयोजक तथा भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांची उपस्थिती होती.