घरफोडीत ५६ हजारांची रक्कम लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:19 IST2021-05-25T04:19:55+5:302021-05-25T04:19:55+5:30
राव्हा येथील शेतकरी गोविंद मुरलीधर शिंदे हे २२ मे रोजी रात्री कुटुंबियांसह घरात झोपले होते. २३ मे रोजी सकाळी ...

घरफोडीत ५६ हजारांची रक्कम लंपास
राव्हा येथील शेतकरी गोविंद मुरलीधर शिंदे हे २२ मे रोजी रात्री कुटुंबियांसह घरात झोपले होते. २३ मे रोजी सकाळी ५ च्या सुमारास गोविंद शिंदे यांची पत्नी झाडझुड करण्यासाठी उठली असता, त्यांना त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या एका खोलीचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला. त्यामुळे त्यांनी पती गोविंद शिंदे यांना ही माहिती सांगितली. त्यानंतर शिंदे यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले ५० हजार रुपये व साडीमध्ये ठेवलेले ६ हजार रुपये अशी एकूण ५६ हजारांची रोख रक्कम गायब असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी चारठाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.