रस्ता डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:16 IST2021-05-23T04:16:33+5:302021-05-23T04:16:33+5:30
मूलभूत सोयी-सुविधा निधीअंतर्गत या रस्त्याच्या विकास कामांसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ...

रस्ता डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात
मूलभूत सोयी-सुविधा निधीअंतर्गत या रस्त्याच्या विकास कामांसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्यावतीने या रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली असून, आता या रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे.
रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी आ. डॉ. राहुल पाटील यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत आ. पाटील यांनी या रस्त्याआठी निधी मंजूर केला. रस्त्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. १८ मे रोजी आ. डॉ. पाटील यांनी या कामाची पाहणी केली. लवकरच काम पूर्ण होऊन नागरिकांची गैरसोय दूर होईल, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे उघडा महादेव ते एमआयडीसी या रस्त्याचे कामही लवकरच सुरू केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नंदकुमार अवचार, मनपा गटनेते चंदू शिंदे, नगरसेवक प्रशास ठाकूर, सभापती सचिन देशमुख, उद्धव मोहिते, अरविंद देशमुख, प्रा. गजानन काकडे ,बाबू फुलपगार, गोपाळ कदम, प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते