गुणवंत विद्यार्थिंनींचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:18 IST2020-12-06T04:18:05+5:302020-12-06T04:18:05+5:30
शिष्यवृत्ती देण्याची मागणी परभणी: ओबीसी प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांची मागील शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी, विविध विद्यापीठ व ...

गुणवंत विद्यार्थिंनींचा सत्कार
शिष्यवृत्ती देण्याची मागणी
परभणी: ओबीसी प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांची मागील शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी, विविध विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये नि:शुल्क प्रवेश द्यावा, टीसी काढताना कोणतीही फीस आकारली जावू नये, आगामी पहिल्या सत्रापर्यंत विद्यार्थ्यांकडून फीस आकारु नये, अशी मागणी जय वारकरी ब्रिगेडच्या वतीने ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर जय वारकरी बिग्रेडच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जि. प. सीईओंना निवेदन
परभणी: तालुक्यातील पेडगाव येथील शाळेचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार करण्यात येत नसून थातूरमातूर केले जात आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शाळा बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने एका निवेदनाद्वारे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांच्याकडे केली आहे. निवेदनावर सुरेश खरात यांची स्वाक्षरी आहे.
घरकुल कामांसाठी वाळू मिळेना
परभणी: जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाळूघाटांचे लिलाव झाले नसल्याने घरकुल बांधकामासाठी वाळू मिळत नाही. बाजारपेठेत वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या दराने वाळू खरेदी करुन घरकुल बांधकाम करणे लाभार्थ्यांसाठी खर्चिक बाब असून प्राप्त अनुदानात घरकुल पूर्ण होत नसल्याने बहुतांश लाभार्थ्यांनी बांधकामे ठप्प ठेवली आहेेत. त्यामुळे महसूल प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वाळू उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होत आहे.
फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन
परभणी: शहरातील बाजारपेठ भागांमध्ये वारंवार फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. विशेषत: सकाळी १० आणि सायंकाळी ७ वाजेनंतर बाजारपेठेत गर्दी वाढत असून या काळामध्ये नागरिकांमध्ये फिजिकल डिस्टन्स ठेवले जात नाही. परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.