उपशिक्षणाधिकाऱ्यांचा गाडे यांचा पदभार काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:15 IST2021-04-05T04:15:41+5:302021-04-05T04:15:41+5:30
राजकीय पदाधिकारी आणि काही शिक्षण संस्थाचालकांच्या दबावातून जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकाऱ्यांचा ...

उपशिक्षणाधिकाऱ्यांचा गाडे यांचा पदभार काढा
राजकीय पदाधिकारी आणि काही शिक्षण संस्थाचालकांच्या दबावातून जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार शिक्षण विभागाचा संबध नसलेल्या मग्रारोहयो विभागातील सहायक गटविकास अधिकारी जयंत गाडे यांना दिला आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला असून, टाकसाळे यांच्या निर्णयावर सर्व स्तरातून टीका होत असताना त्यांच्याकडून मात्र कसलीही कारवाई होताना दिसून येत नाही. या वादात आता जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांनीही उडी घेतली असून, गाडे यांचा पदभार तातडीने काढण्याची मागणी त्यांनी टाकसाळे यांच्याकडे केली आहे. हा पदभार देताना किमान त्याच विभागातील संबंधित अधिकारी असावा असे संकेत असताना सर्व नियम पायदळी तुडवून गाडे यांना पदभार देण्यात आला आहे. भविष्यात त्यांच्याकडून काही बेकायदेशीर निर्णय घेतले गेल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार शिक्षण विभागास राहणार नाही. त्यामुळे जबाबदारी निश्चित होणार नाही. त्यामुळे जि. प. चा कारभार पारदर्शक करून गाडे यांचा पदभार तातडीने काढून योग्य त्या व्यक्तीला द्यावा, असेही या निवेदनात डॉ. कदम यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता गाडे यांचा पदभार काढला जाणार की नाही, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.