अपात्र लाभार्थींची वसुली रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:20 IST2021-05-25T04:20:02+5:302021-05-25T04:20:02+5:30

आयकर विभागाकडून तालुक्यातील पीएम किसान योजनेंतर्गत अपात्र ३९१ जणांची यादी महसूल विभागाकडे देण्यात आली होती.या शेतकऱ्यांचा योजनेची तिळमात्र संबंध ...

Recovery of ineligible beneficiaries stalled | अपात्र लाभार्थींची वसुली रखडली

अपात्र लाभार्थींची वसुली रखडली

आयकर विभागाकडून तालुक्यातील पीएम किसान योजनेंतर्गत अपात्र ३९१ जणांची यादी महसूल विभागाकडे देण्यात आली होती.या शेतकऱ्यांचा योजनेची तिळमात्र संबंध नसताना त्यांनी आपले नाव पीएम किसान योजनेत समाविष्ट करून २ हजार रुपये याप्रमाणे ३४ लाख ८६ हजार रुपये योजनेतील निधी उचलला होता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील अनेक लोक घेत असल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील अशा ३९१ बोगस लाभधारकांना ३७ लाख ८२ हजार रुपयांची रक्कम परत करण्याचा आदेश देण्यात आला होता. महसूल विभागाने पहिली नोटीस काढल्यानंतर २४७ शेतकऱ्यांकडून २३ लाख ३६ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. नोटीस काढून तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी १४४ शेतकऱ्यांनी १४ लाख ४६ हजार रुपयांची रक्कम भरली नव्हती. हे शेतकरी रक्कम भरण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना महसूल विभागाने फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसरी नोटीस काढली होती. दुसरी नोटीस काढून दोन माहिन्यांचा कालावधी उलटून गेला, तरी १४४ पैकी केवळ २२ शेतकऱ्यांनी १ लाख ९० हजार रुपयांची रक्कम ७ एप्रिलपर्यंत भरली आहे. उर्वरित १२२ शेतकऱ्यांकडून वसुली करणे बाकी आहे. एप्रिल-मे महिन्यात शासकीय कार्यालये बंद राहिल्याने उर्वरित वसुली रखडली असल्याचे चित्र आहे.

Web Title: Recovery of ineligible beneficiaries stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.