दहा हजार तपासण्यांमध्ये ५४० रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:16 IST2021-05-24T04:16:35+5:302021-05-24T04:16:35+5:30

परभणी : कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात घटला आहे. २३ मे रोजी १० हजार २४१ तपासण्यांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त ...

Record of 540 patients in ten thousand tests | दहा हजार तपासण्यांमध्ये ५४० रुग्णांची नोंद

दहा हजार तपासण्यांमध्ये ५४० रुग्णांची नोंद

परभणी : कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात घटला आहे. २३ मे रोजी १० हजार २४१ तपासण्यांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यात ५४० नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, तर दिवसभरात कोरोनावर उपचार घेणाऱ्या ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मागच्या दोन-तीन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात घटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासण्यांची संख्या वाढली आहे. ही संख्या वाढविल्यानंतरही रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. रविवारी प्रशासनाला १० हजार २४१ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ५४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या १० हजार ७१ अहवालांमध्ये ५१५ आणि रॅपिड टेस्टच्या १७० अहवालांमध्ये २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या ४८ हजार ४०१ झाली असून, त्यातील ४३ हजार ७९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार १९८ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला. सध्या ३ हजार ४९० रुग्ण उपचार घेत आहेत.

रविवारी दिवसभरात आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात १, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ३, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात १ आणि खासगी रुग्णालयांमध्ये २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या ८ रुग्णांमध्ये ६ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे.

१०८ रुग्णांना सुट्टी

कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरी कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण मागच्या काही दिवसांपासून कमी झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी ३०० ते ४०० रुग्ण दररोज कोरोनामुक्त होत होते. सध्या हे प्रमाण १०० ते १५० पर्यंत पोहोचले आहे. रविवारी १०८ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

Web Title: Record of 540 patients in ten thousand tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.