५२२ बाधितांची नोंद; आठ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:15 IST2021-04-05T04:15:48+5:302021-04-05T04:15:48+5:30
परभणी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. रविवारीही बाधितांची वाढ कायम राहिली. दिवसभरात जिल्ह्यात ५२२ रुग्णांची ...

५२२ बाधितांची नोंद; आठ जणांचा मृत्यू
परभणी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. रविवारीही बाधितांची वाढ कायम राहिली. दिवसभरात जिल्ह्यात ५२२ रुग्णांची आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे. तसेच आठ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यात तीन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. तसेच रविवारी ३४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार २७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील १२ हजार ८२५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ४४३ जणांचा मृत्यू झाला असून, विविध आरोग्य संस्थांमध्ये सद्य:स्थितीत ३ हजार ५ रुग्ण उपचार घेत आहेत.
बाधित रुग्णांमध्ये परभणी, पालम, जिंतूर, गंगाखेड सेलू, जिंतूर, सोनपेठ, पूर्णा, मानवत, पाथरी तालुक्यातील रुग्णांसह हिंगोली, नांदेड, जालना आदी जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे.