गंगाखेड येथील महिलेचे अपहरण करून अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 16:48 IST2018-12-21T16:48:00+5:302018-12-21T16:48:21+5:30
या प्रकरणी खादगाव येथील एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाखेड येथील महिलेचे अपहरण करून अत्याचार
गंगाखेड (परभणी ) : जिवे मारण्याची धमकी देत शहरातील एका ३१ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर पुणे, शिर्डी येथे अत्याचार करण्यात आल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी खादगाव येथील एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका ३१ वर्षीय विवाहितेवर खादगाव येथील दिलीप उत्तम व्हावळे याने ११ नोव्हेंबरला अत्याचार केले. यानंतर अत्याचाराची व्हिडीओ सर्वत्र दाखविण्याची धमकी देत १६ नोव्हेंबरला तिचे अपहरण केले. यानंतर दि. १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान पुणे व शिर्डी येथे नेऊन अत्याचार केले, अशी फिर्याद विवाहितेने गुरुवारी रात्री पोलीस स्थानकात दिली. यावरून दिलीप उत्तम व्हावळे यांच्या विरुद्ध विनयभंग, बलात्कार व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राजेश राठोड, पो.शि. ओम वाघ करत आहेत.