परभणी, गंगाखेडमध्ये जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 01:03 IST2018-06-21T01:03:18+5:302018-06-21T01:03:18+5:30

आठवडाभराच्या खंडानंतर बुधवारी परभणी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत़

Rainfall in Parbhani, Gangakhed | परभणी, गंगाखेडमध्ये जोरदार पाऊस

परभणी, गंगाखेडमध्ये जोरदार पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आठवडाभराच्या खंडानंतर बुधवारी परभणी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत़
परभणी शहर व परिसरामध्ये बुधवारी सायंकाळी ६़३० वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला़ अर्ध्या तासाच्या पावसाने शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते़ दिवसभर उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला़ गंगाखेड शहरातही विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला़
तालुक्यातील मरडसगाव, मसनेरवाडी, माखणी, धारासूर, मैराळ सावंगी, गौंडगाव, चिंचत टाकळी, खळी आदी गावांमध्ये एक तास जोरदार पाऊस झाला़ खंडाळी राणीसावरगाव या परिसरातही बुधवारी चांगला पाऊस झाल्याने शेतकºयांच्या आशा उंचावल्या आहेत़ सोनपेठ तालुक्यातही रिमझिम पावसाने हजेरी लावली़ इतर तालुक्यांत मात्र पाऊस झाला नाही़

Web Title: Rainfall in Parbhani, Gangakhed