Rabi crops 'washed' with pre-monsoon rains; major setback to the farmers of the 3 talukas of Parabhani Dist | रबी पिकांना अवकाळी पावसाने 'धुतले'; परभणीत ३ तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला मोठा फटका

रबी पिकांना अवकाळी पावसाने 'धुतले'; परभणीत ३ तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला मोठा फटका

ठळक मुद्देमंगळवारी मध्यरात्री हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला.जिल्ह्यातील ३ तालुक्यांत सरासरी १.५४ मि.मी. पावसाची नोंद झाली.

परभणी: जिल्ह्यातील परभणी, जिंतूर व सेलू या ३ तालुक्यांमध्ये मंगळवारी मध्यरात्री हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा मोठा फटका रबी हंगामातील पिकांना बसण्याची शक्यता आहे.

सेलू शहर व परिसरात मंगळवारी रात्री ९.४५ च्या पावसाच्या सरी कोसळल्या. मेघ गर्जनेसह झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. रात्री सेलू शहर व परिसरात ८ मि.मी. पाऊस झाल्याची महसूल विभागाकडे नोंद झाली आहे. याशिवाय देऊळगाव मंडळात ३, कुपटा मंडळात ४, वालूर मंडळात २ मि.मी. पाऊस झाला. तालुक्यात चिकलठाणा महसूल मंडळात सर्वाधिक म्हणजे ३० मि.मी. पाऊस झाला. तालुक्यात सरासरी ९.४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

परभणी शहरात २ मि.मी. तर परभणी ग्रामीण महसूल मंडळात ४ मि.मी., पेडगाव मंडळात ५.६० तर जांब मंडळात ५ मि.मी. पाऊस झाला. तालुक्यात सरासरी २.११ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिंतूर महसूल मंडळात २, सावंगी म्हळसा मंडळात ४, चारठाण्यात ३ तर बामणी मंडळात ५ मि.मी. पाऊस झाला. तालुक्यात सरासरी २.३३ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील ३ तालुक्यांत सरासरी १.५४ मि.मी. पावसाची नोंद झाली. शेतात सध्या ज्वारी, गहू काढणीचे काम सुरु आहे. त्यामुळे या पावसामुळे रबी हंगामातील पिकांना फटका बसणार आहे.

Web Title: Rabi crops 'washed' with pre-monsoon rains; major setback to the farmers of the 3 talukas of Parabhani Dist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.