पुर्णेत रेल्वे इंजिन रुळावरुन घसरले; कोणतीही हानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 19:09 IST2020-05-11T19:06:07+5:302020-05-11T19:09:24+5:30
पूर्णा रेल्वे स्थानकावर ११ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घटना घडली

पुर्णेत रेल्वे इंजिन रुळावरुन घसरले; कोणतीही हानी नाही
पूर्णा: यार्डात हलविण्यात येणारे रेल्वे इंजिन रुळावरुन घसरल्याचा प्रकार पूर्णा रेल्वे स्थानकावर ११ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.
पूर्णा रेल्वे स्थानकावर अतिरिक्त असलेले इंजिन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना अकोला लाईनकडे असलेल्या रुळावरुन अचानक खाली घसरले. घसरलेले इंजिन त्या रुळाच्या डेड एंड (शेवटचा भाग) तोडून पुढे घसरत त्या ठिकाणी असलेल्या सिग्नल बॉक्सला धडकले. रेल्वे स्थानकावर असलेल्या दुर्घटनाग्रस्त इंजिनला १०४ क्रेनच्या सहाय्याने रुळावर आणण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. २ ते ३ तासानंतर हे इंजिन रुळावर येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.