नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:18 IST2021-04-01T04:18:14+5:302021-04-01T04:18:14+5:30
रानडुकराच्या उपद्रवाने शेतकरी हैराण पालम : तालुक्यातील आरखेड, पेठशिवणी, बनवस आदी परिसरात मागील काही दिवसांपासून रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. ...

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा
रानडुकराच्या उपद्रवाने शेतकरी हैराण
पालम : तालुक्यातील आरखेड, पेठशिवणी, बनवस आदी परिसरात मागील काही दिवसांपासून रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा वनविभागाला रानडुकराच्या उपद्रवाची माहिती दिली.
कापसाचे भाव उतरले
परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्याकडील संपूर्ण कापूस विक्री केल्यानंतर प्रतिक्विंटल सहा हजारांहून अधिक भाव कापसाला मिळाला. मात्र मागील आठ दिवसांपासून कापसाचे भाव उतरले असून, पाच हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलवर येऊन पोहोचले आहेत.
कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ
परभणी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता संसर्ग लक्षात घेता परभणी प्रशासनाच्या वतीने नागरिकांना वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. मात्र आजही शहरातील रस्त्यावरून विनामास्क व सोशल डिस्टन्सकडे दुर्लक्ष करून नागरिक फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
विद्युत बिल न देताच महावितरणकडून वसुली
परभणी : जिल्ह्यातील ९२ हजार कृषिपंपधारकांना वीज वितरण कंपनीकडून वर्षानुवर्षे विद्युत बिल वितरित करण्यात आले नाही. मात्र मार्चएण्डच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिल आकारून विद्युत बिलाची वसुली केली जात आहे. यामुळे कृषिपंपधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.