चारठाण्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 15:41 IST2019-02-12T15:33:33+5:302019-02-12T15:41:31+5:30

जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांनी धाडसत्र सुरु केले आहे.

Police raid on a gambling stand | चारठाण्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

चारठाण्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

ठळक मुद्देदोन लाखांचा ऐवज जप्ततिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

परभणी- चारठाणा गावात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर सोमवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून रोख ६ हजार ६८० रुपये आणि तीन मोटारसायकल, चार मोबाईल असा २ लाख १४ हजार ८० रुपयांचा ऐवज जप्त केला. 

जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांनी धाडसत्र सुरु केले आहे. या अंतर्गत चारठाणा गावात जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी दीपक ऊर्फ बाळू भानूदास क्षीरसागर, अजय प्रभाकर देशमुख आणि शंकर गोपीचंद राठोड (रा.चारठाणा) हे जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी आरोपींकडून रोख ६ हजार ६८० रुपये, तीन मोटारसायकल आणि जुगाराचे आकडे टाईप करण्यासाठी ठेवलेले चार मोबाईल असा २ लाख १४ हजार ८० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एच.जी.पांचाळ, हेकॉ.हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, जगदीश रेड्डी, घनसावंत, कोल्हे, कांदे, मुंडे, पुजा भोरगे यांनी केली.

Web Title: Police raid on a gambling stand