विजेच्या धक्काबसून पोलीस पाटील वैजनाथ गूट्टे यांचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 17:20 IST2019-04-22T17:17:43+5:302019-04-22T17:20:19+5:30

राहत्या घरी विजेच्या धक्क्याने मृत्यु झाला

Police Patil Vayjnath Goethe dies of electricity | विजेच्या धक्काबसून पोलीस पाटील वैजनाथ गूट्टे यांचा मृत्यु

विजेच्या धक्काबसून पोलीस पाटील वैजनाथ गूट्टे यांचा मृत्यु

गंगाखेड (परभणी ) : पालम तालुक्यातील सादगीरवाडी येथील पोलीस पाटील वैजनाथ किशन गूट्टे यांचा रविवारी (दि. २१) रात्री ८ वाजेच्या सुमारास राहत्या घरी विजेच्या धक्क्याने मृत्यु झाला

सादगीरवाडी येथील वैजनाथ गूट्टे (३२) यांना रविवारी राहत्या घरी विजेचा धक्का बसला. याची माहिती मिळताच नवनाथ मुसळे, अतुल गुट्टे, राजाभाऊ केंद्रे आणि नातेवाईकांनी गूट्टे यांना राणीसावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यानंतर पुढील उपचारासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती मुंडे यांनी त्यांना मृत घोषीत केले. 

यावेळी जमादार सुरेश पाटील, प्रविण कांबळे यांनी रुग्णालयात पंचनामा केला. याप्रकरणी प्रा. वसंत पांडुरंग गुट्टे यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 
 

Web Title: Police Patil Vayjnath Goethe dies of electricity