सिंचन क्षेत्र सुरक्षिततेसाठी लक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST2021-03-25T04:17:27+5:302021-03-25T04:17:27+5:30
वातावरणातील बदलाचा आंब्यावर परिणाम देवगाव फाटा : मागील आठवड्याभरातील वातावरणातील बदलाचा परिणाम आंब्यावर झाला आहे. फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या ...

सिंचन क्षेत्र सुरक्षिततेसाठी लक्ष द्या
वातावरणातील बदलाचा आंब्यावर परिणाम
देवगाव फाटा : मागील आठवड्याभरातील वातावरणातील बदलाचा परिणाम आंब्यावर झाला आहे. फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या आंब्याचा मोहर वारे व पावसाच्या सरीने गळून पडला आहे. त्यामुळे गावरान आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.
पर्यटनस्थळ कृती आराखड्याची गरज
देवगाव फाटा : निसर्गाच्या सौंदर्यात स्थापित सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातील बोरकिनी, ढेंगळी पिंपळगाव, सिमणगाव, धनेगाव यासह सर्वच ठिकाणची पर्यटनस्थळे ही विकासाअभावी दुर्लक्षित आहेत.त्यामुळे पुरातत्व विभागाकडून यासाठी विकास कृती आराखडा तयार करून तो अंमलात आणण्याची गरज आहे.
लसीकरणाबाबत आवाहन
देवगाव फाटा : कोरोना प्रतिबंधासाठी समाजात सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित होण्यास कोविड लस परिणामकारक ठरणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी स्वतः पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे. ४५ वर्षांवरील सर्वांना आता १ एप्रिलपासून लस दिली जाणार असल्याने यासाठी नावनोंदणी करावी तसेच कोरोना आजारापासून आपले कुटुंब सुरक्षित ठेवून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे अवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांनी केले आहे.