शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पाथरी पंचायत समितीवर आमदार राजेश विटेकरांचा 'पॉवर गेम'! काँग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादीची सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:49 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व जागा जिंकल्या; बाबाजानी दुर्राणींचा पाठिंबा अन् राजेश विटेकरांचा डाव यशस्वी

पाथरी (जि. परभणी): पाथरी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीमध्ये स्पष्ट बहुमत नसतानाही आमदार राजेश विटेकर यांनी टाकलेला राजकीय डाव अखेर यशस्वी झाला आहे. काँग्रेसच्या दोन सदस्यांच्या सहकार्याने आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या बिनशर्त पाठिंब्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदांवर विजय मिळवत सत्ता आपल्याकडे राखली आहे.

असे जुळले विजयाचे गणित१० सदस्य असलेल्या पाथरी पंचायत समितीत राष्ट्रवादीकडे ४, उद्धवसेनेकडे ३, काँग्रेसकडे २ आणि शिंदेसेचे १ असे संख्याबळ होते. उद्धवसेनेने शिंदेसेनेच्या मदतीने राष्ट्रवादीला रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आमदार विटेकरांनी काँग्रेसच्या दोन सदस्यांना सोबत घेत सहा मतांचा कोटा पूर्ण केला. मतदानात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ६ तर उद्धवसेनेच्या उमेदवारांना ४ मते पडली.

सुनीता डुकरे सभापती, तर सचिन अंबुरे उपसभापतीराष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती सुनीता गजेंद्र डुकरे यांनी उद्धवसेनेच्या मनीषा कोल्हे यांचा पराभव करत सभापती पद पटकावले. तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीचे सचिन लिंबाजी अंबुरे यांनी उद्धवसेनेच्या ज्ञानेश्वर शिंदे यांचा पराभव केला. या विजयामुळे पाथरी मतदारसंघातील पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणी या चारही पंचायत समितीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्ण वर्चस्व निर्माण झाले आहे. या निकालाने जिल्ह्यात आमदार राजेश विटेकर यांचे राजकीय महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vitkar's power play: NCP wins Pathri Panchayat Samiti with Congress help.

Web Summary : Rajesh Vitekar secured NCP's victory in Pathri Panchayat Samiti elections with Congress support, despite lacking a clear majority. Sunita Dukre became president, Sachin Ambure vice-president, solidifying NCP's dominance.
टॅग्स :parabhaniपरभणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस