पाथरीत चाकूचा धाक दाखवून दरोडा; २ लाखाचा मुद्देमाल लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 17:16 IST2018-09-08T17:14:53+5:302018-09-08T17:16:27+5:30

ज्ञानेश्वर नगर येथे एका घरावर दरोडा टाकत चोरट्यांनी २ लाख १६ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. 

In Pathari Daroda on a knife; 2 lacs looted | पाथरीत चाकूचा धाक दाखवून दरोडा; २ लाखाचा मुद्देमाल लंपास 

पाथरीत चाकूचा धाक दाखवून दरोडा; २ लाखाचा मुद्देमाल लंपास 

पाथरी (परभणी ) : ज्ञानेश्वर नगर येथे एका घरावर दरोडा टाकत चोरट्यांनी २ लाख १६ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुभाष गरड यांचे ज्ञानेश्वर नाहर येथे घर आहे. आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास पाच चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. गरड यांना चाकू आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवत त्यांनी सोनेचांदी, मोबाईल आणि रोख रक्कम असा २ लाख १६ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. यानंतर गरड यांनी दरोड्याची माहिती पोलिसांना दिली.  

सकाळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्वास पानसरे, उपअधीक्षक  रेणुका वागळे, पोलीस निरीक्षक व्ही डी श्रीमन्वर, सहायक पोलिस निरीक्षक व्ही एम बोधगिरे यांनी घटनास्थळी भेट दिली. परभणी येथून श्वान पथक आणि ठसे तज्ञ यांनी तपासणी केली. दरम्यान, सुभाष गरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तीन पथके स्थापन करून तपास सुरु केला आहे. 

Web Title: In Pathari Daroda on a knife; 2 lacs looted