परभणीत बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 23:53 IST2019-03-05T23:53:51+5:302019-03-05T23:53:57+5:30
संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने ५ मार्च रोजी पुकारलेल्या भारत बंदला परभणी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला़

परभणीत बंदला संमिश्र प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने ५ मार्च रोजी पुकारलेल्या भारत बंदला परभणी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला़
१३ पॉर्इंट रोस्टर, ईव्हीएम मशीन, संवर्णांना १० टक्के आरक्षण याविरूद्ध संविधान बचाव संघर्ष समितीने भारत बंदचे आवाहन केले होते़ ५ मार्च रोजी परभणी शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़ शहरातील बाजारपेठ भागातील काही दुकाने सकाळपासूनच बंद होती़ तर काही दुकाने सुरळीत सुरू असल्याचे पहावयास मिळाले़ बंदमुळे बाजारपेठेतील उलाढालीवर अल्पस: परिणाम झाल्याचे जाणवले़ दरम्यान, संविधान बचाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदविला़ समितीचे लखन चव्हाण, कचरू गोडबोले, सुभाष साळवे, विकास माने, सुरेश गिराम, प्रमोद लाटे, प्रल्हाद कोळेकर, छत्रपती तुपसुंदर, बबन भंडारे, राजू गांधारे, संदीप एंगडे, कैलास भालेराव, कुशल टेकुळे, विनोद वानखेडे, भैय्या आगळे, विकास जाधव, राहुल चव्हाण, बाबासाहेब कांबळे आदींनी आंदोलनात सहभाग नोंदविला़