परभणी : जिल्हा परिषदेच्या राजकारणात महायुतीतील बेबनावामुळे निर्माण झालेली परिस्थिती अखेर निवळणार आहे. भाजप, राष्ट्रवादी व शिंदेसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बहुमतासमोर विरोधक निष्प्रभ होणार आहेत.
जिल्हा परिषदेत भाजप २४, राष्ट्रवादी १५, शिंदेसेना ५ असे ४४ सदस्य महायुतीचे निवडून आले आहेत तर उद्धवसेना ६, काँग्रेस ३ व १ अपक्ष निवडून आला आहे. भाजपने निकालाच्या दिवशीच शिंदेसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केल्यानंतर राष्ट्रवादीची तगमग वाढली होती. राष्ट्रवादीनेही विरोधकांना एकत्र करून डाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्याला शिंदेसेनेची जोड मिळाली तर भाजपची बाजी कधीही पलटू शकते, अशी स्थिती होती शिवाय भाजपने शिंदेसेनेला मागच्या काही दिवसांत ज्या पद्धतीने कमी लेखले, त्यामुळे ही मंडळीही नाराज होती. त्यातच भाजपसोबत गेल्यास त्यांना फारसा फायदा होईल, असेही काही नव्हते. शिंदेसेनेला केवळ एका पदावर तडजोड करण्याची वेळ येते की काय? असे चित्र होते. त्यात शिंदेसेनेत तीन तीन कारभारी असल्याने भाजपचीही डोकेदुखी वाढणार होती तर जि.प.च्या राजकारणात आतापर्यंत वरचढ राहिलेली राष्ट्रवादी या संधीचा कधीही फायदा घेण्यास सज्ज होती. भाजपला कोंडीत पकडण्यासाठी सर्वच पक्ष कधी मोट बांधतील, याचा काही नेम नव्हता.
अध्यक्षपद भाजपकडेच राहणारजि.प.च्या सत्तेत भाजप सर्वांत मोठा पक्ष असल्याने त्यांना अध्यक्षपदासह दोन सभापतिपदे मिळणार असल्याचे ऐकायला मिळत आहे तर राष्ट्रवादीला उपाध्यक्षपदासह एक सभापतिपद व शिंदेसेनेच्या वाट्याला एक सभापतिपद येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पहिल्यांदाच होणार भाजपचा अध्यक्षजि.प.च्या इतिहासात आतापर्यंत एकदाही भाजपचा अध्यक्ष झाला नाही. यावेळी पहिल्यांदाच भाजपला तशी संधी चालून आली आहे. त्यातही आधी बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडू लागल्याने अनिश्चिततेचे सावट दिसत होते. मात्र, आता महायुती एकत्र येणार असल्याने त्यांना पहिल्यांदाच ही संधी मिळणार आहे.
Web Summary : Mahayuti (BJP, NCP, Shinde Sena) will form government in Parbhani Zilla Parishad. BJP is likely to get the President post for the first time, along with two committee chairman positions. NCP will likely get vice-president post.
Web Summary : परभणी जिला परिषद में महायुति (भाजपा, राकांपा, शिंदे सेना) सरकार बनाएगी। भाजपा को पहली बार अध्यक्ष पद मिलने की संभावना है, साथ ही दो समिति अध्यक्ष पद भी। राकांपा को उपाध्यक्ष पद मिलने की संभावना है।