परभणी : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:18 IST2019-03-02T00:17:38+5:302019-03-02T00:18:02+5:30
शहरातील वांगीरोड भागातील साईबाबानगर येथे एका व्यक्तीचा खून केल्या प्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथून जेरबंद केले आहे.

परभणी : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील वांगीरोड भागातील साईबाबानगर येथे एका व्यक्तीचा खून केल्या प्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथून जेरबंद केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, परभणी शहरातील वांगीरोड भागातील साईबाबानगर येथे एका घरात चार ते पाच जणांनी एका व्यक्तीचा खून केला होता.
खुनाचे पुरावे नष्ट करण्याच्या हेतुने मृतदेह आॅटोमध्ये नेऊन धाररोडवरील मनपाच्या डपिंग ग्राऊंडमधील कचऱ्यात जाळून टाकला होता. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळेसपासून आरोपी विकास विलास भालेराव (२०) हा फरार होता. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसी भागातून आरोपीस शिताफीने स्थागुशाच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला परभणीत नानलपेठ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व स्थागुशाचे पोलीस अधीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. शिवाजी देवकते, पोह.हनुमंत जक्केवाड, लक्ष्मीकांत धूतराज, गणेश कौटकर, राजेश आगासे यांच्या पथकाने केली.