शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

परभणी: भिंतीचे दगड ढासळल्याने येलदरी धरणाला धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 11:58 PM

मराठवाड्यातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक धरण असलेल्या येलदरी धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर झाडे वाढली असून काही भागात माती ढासळू नये म्हणून लावलेले दगड निखळून पडत आहेत. त्यामुळे भविष्यात या धरणालाही धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा तज्ज्ञांकडून धरणाच्या सद्यस्थितीची पाहणी होणे गरजेचे झाले आहे. मात्र जलसंपदा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): मराठवाड्यातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक धरण असलेल्या येलदरी धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर झाडे वाढली असून काही भागात माती ढासळू नये म्हणून लावलेले दगड निखळून पडत आहेत. त्यामुळे भविष्यात या धरणालाही धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा तज्ज्ञांकडून धरणाच्या सद्यस्थितीची पाहणी होणे गरजेचे झाले आहे. मात्र जलसंपदा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.येलदरी येथे १९६८ साली धरण बांधकाम करण्यात आले. मराठवाड्यातील सर्वात जुन्या धरणांपैकी हे एक धरण आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने या धरणाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर झुडूपे वाढली आहेत, दगड ढासळत आहेत. त्यामुळे भविष्यात हे धरण १०० टक्के भरले तर मातीच्या भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र याचे गांभीर्य जलसंपदा विभागाला राहिलेले नाही. येलदरी धरणाची परिस्थिती सध्या हे धरण बेवारस झाले आहे. सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या धरणाची तज्ज्ञांकडून पाहणी करण्याची आवश्यकता आहे.सुरक्षा विभागाच्या शिष्टमंडळाचा अहवाल गुलदस्त्यात४नाशिक येथील धरण सुरक्षा विभागाच्या एका शिष्टमंडळाने तीन महिन्यांपूर्वी या धरणाची पाहणी केली होती. धरण परिसरातील अति महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करून हा अहवाल जलसंपदा विभागाला सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु, पाहणीनंतर या अहवालाचे काय झाले? हे अद्याप समजले नाही.४या पाहणीत धरणाची दगडी भिंत, मातीच्या भिंतीची पाहणी केली होती. मातीच्या भिंतीच्या आतून पाझरणारे पाणी योग्य प्रमाणात आहे किंवा नाही, धरणाचा मुख्य गाभा व्यवस्थित आहे का? पावसाळ्यात कोणती कामे करावी लागतील, याचा आढावा शिष्टमंडळाने घेतला होता.पूर्णवेळ : अधिकारी मिळेना४मागील पाच ते सहा वर्षापासून या प्रकल्पासाठी एकही पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध नाही. नियमित कर्मचारीही नाहीत. एकेकाळी शंभरहून अधिक कर्मचारी असणाऱ्या या धरणावर आता बोटावर मोजण्याएवढेच कर्मचारी आहेत. तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. त्यामुळे दुरुस्तीची कामे ठप्प आहेत. याशिवाय वार्षिक देखभाल दुरुस्तीची कामे होत नसल्याने धरणाचे मोठे नुकसान होत आहे. पुरेशी वीज व्यवस्था, सुरक्षारक्षक या सुविधा उपलब्ध नसल्याने हे धरण आजमितीला बेवारस झाले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प