शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

परभणी : वर्षे सरली तरी मागासलेपण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:07 IST

स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती होऊन ५९ वर्षांचा कालावधी लोटला आहे़ या प्रदीर्घ कालावधीत राज्यातील एक भाग असलेल्या परभणी जिल्ह्याने काय कमावले, काय गमावले, याचे अवलोकन केले असता, एक-एक वर्षे सरते झाले़ मात्र जिल्ह्यातील विकास विषयक प्रश्नांची स्थिती ‘जैसे थे’ असल्याचेच दिसते. त्यामुळे वर्ष सरले; परंतु, विकास मात्र मागे पडला, अशी एकंदरित भावना निर्माण झाली आहे़

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती होऊन ५९ वर्षांचा कालावधी लोटला आहे़ या प्रदीर्घ कालावधीत राज्यातील एक भाग असलेल्या परभणी जिल्ह्याने काय कमावले, काय गमावले, याचे अवलोकन केले असता, एक-एक वर्षे सरते झाले़ मात्र जिल्ह्यातील विकास विषयक प्रश्नांची स्थिती ‘जैसे थे’ असल्याचेच दिसते. त्यामुळे वर्ष सरले; परंतु, विकास मात्र मागे पडला, अशी एकंदरित भावना निर्माण झाली आहे़परभणी जिल्ह्याच्या समग्र विकासासाठी शासन, प्रशासनाकडे मोठा वाव आहे; परंतु, उदासिनतेमुळे ठोस विकास कामे झाली जिल्ह्यात झाली नाहीत़ सिंचन, पर्यटन, उद्योग, शिक्षण अशा कोणत्याही क्षेत्राचा विचार केला तर काही मिळविण्यापेक्षा असलेले टिकविणेही शक्य झाले नसल्याचे दिसत आहे़ १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे़ त्यामुळे या दिवशी परभणी जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने मंथन आणि चिंतन करून यापुढे तरी ठोस दिशा निश्चित करून जिल्ह्याला विकास मार्गावर नेण्याची गरज निर्माण झाली आहे़ नैसर्गिक वारसा आणि दळणवळणाच्या मुबलक सुविधा उपलब्ध असलेल्या परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक मार्ग खुले आहेत; परंतु, या मार्गाने जाण्याची मानसिकता निर्माण होत नसल्याने स्वतंत्र महाराष्ट्राच्या ५९ वर्षांमध्येही जिल्ह्यात भरीव अशी कामे झाली नाहीत़ नवीन कामे तर सोडाच; परंतु, जी साधने उपलब्ध आहेत़, ती टिकवितानाही कमी पडल्याची परिस्थिती आहे़ नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात असलेल्या या जिल्ह्यात जिंतूर तालुक्यामध्ये येलदरी धरण वसलेले आहे़ या धरणाच्या विकासाच्या अनुषंगाने निधी प्राप्त होत नाही़ नवीन कामे ठप्प आहेत़ धरण परिसरात पर्यटनक्षेत्र विकसित करणे आवश्यक आहे़ त्याचा प्रस्तावही तयार झालेला असताना त्यास गती मिळत नसल्याने हे धरण प्रशासकीय स्तरावर दुर्लक्षित राहत आहे़ त्याच जोडीला सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्प ३० वर्षांपासून रखडला होता़ मागील वर्षी या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सिंचाई योजनेंतर्गत निधी मंजूर केला़ मात्र धरणाचे काम अद्यापही रखडले आहे़ डावा आणि उजव्या कालव्याची कामे ठप्प आहेत़ मागील काही वर्षांत गोदावरी नदीवर बांधलेली ५ उच्च पातळी बंधारे ही सिंचनातील कामगिरी ठरणारी आहे़ मात्र हे बंधारे बांधले असले तरी त्यातून अद्यापही १०० टक्के सिंचन होत नाही़ तारुगव्हाणचा बंधारा अजूनही अर्धवट अवस्थेत आहे़ शिक्षण क्षेत्रातही वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालयाची जिल्ह्याला आवश्यकता आहे; परंतु, ही कामे रखडलेली आहेत़औद्योगिक क्षेत्रात जिल्ह्याची मोठी पिछेहाट झाली आहे़ रेल्वे, राष्ट्रीय महामार्गाने हा जिल्हा जोडलेला असतानाही या ठिकाणी एकही मोठा प्रकल्प उभारला गेला नाही़ त्यामुळे सर्वच क्षेत्रामध्ये मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्याची स्थिती जैसे थे आहे़बेट खचू लागलेजांभूळबेटाच्या संवर्धनासाठी या संपूर्ण बेटाला तटबंदी उभारणे गरजेचे आहे़ पाण्याच्या प्रवाहाने बेटाचा भाग दिवसेंदिवस खचत आहे़ २५ हेक्टर क्षेत्रावरील हे बेट खचत चालले असून, प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे़जांभूळबेटाचे वैभव लयाला जाण्याच्या स्थितीतच्गोदावरी नदीने विळखा घातल्याने निसर्गनिर्मित जांभूळबेट पालम तालुक्यातील आरखेड, गुळखंड शिवारात तयार झाले आहे़ या बेटावर मोठ्या प्रमाणात वन औषधींची झाडे आहेत़च्जांभूळ, लिंब, नीलगिरी अशा झाडांनी नटलेले हे बेट पर्यटकांना निश्चितच साद घालणारे आहे; परंतु, या बेटाच्या विकासासाठी एक रुपयाचा खर्चही आतापर्यंत झाला नाही़च्हे बेट जिल्हावासियांकडूनच दुर्लक्षित आहे़ या बेटाच्या परिसरात बोटींग, पर्यटकांसाठी निवासस्थाने, बेटापर्यंत पोहोचण्यासाठी तालुक्यापासून चांगला डांबरी रस्ता या मुबलक सुविधा तरी उपलब्ध केल्या तरी हे क्षेत्र चांगले पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते़बेटाच्या अस्तित्वाचाच सुटेना प्रश्नजांभूळबेट हे निसर्गरम्य स्थळ असले तरी या बेटाचा विकास करण्यासाठी हे क्षेत्र महसूल प्रशासनाच्या नोंदीत येणे आवश्यक आहे़ या क्षेत्राची नोंद महसूलच्या दप्तरी अद्यापही झालेली नाही़ त्यामुळे या बेटाचा कुठल्या आधारावर विकास करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे प्रशासनाने किमान या बेटाचे क्षेत्र महसूल दप्तरी नोंद करण्याची गरज आहे़रेल्वेचे प्रश्न सुटेनात४दक्षिण-मध्ये रेल्वेचे जंक्शनचे ठिकाण असलेल्या परभणी रेल्वेस्थानकाचेच अनेक प्रश्न प्रलंबित आहेत़ या स्थानकाच्या विकासासाठी पाठपुरावा कमी पडत असल्याचे दिसत आहे़४परभणी येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असले तरी रेल्वे प्रशासनाकडून पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत़ रेल्वे मार्ग दुहेरीकरण, छोट्या स्थानकाचा विकास ही कामे रखडलेली आहेत़४जिल्ह्यातील साईबाबांची जन्मभूमी असलेल्या पाथरी शहराला जोडणारा मानवत-परळी रेल्वे मार्गाचा प्रश्न प्रलंबित आहे़ या शिवाय पूर्णा तालुक्यातील चुडावा येथून रेल्वे मार्गाला बायपास काढण्याचा प्रश्नही रखडलेला आहे़पर्यटन विकास ठप्पपर्यटनाची ठोस कामे झालीच नाहीत़ येलदरी, जांभूळबेट, नेमगिरी या प्रमुख स्थळांबरोबरच अनेक पुरातन वास्तूंची दुरवस्था झाली आहे़ चारठाणा, धारासूर, गंगाखेड इ. ठिकाणचे पुरातन वैभव प्रशासनाकडून दुर्लक्षित आहे़वीज जाळे वाढेनाजिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था अजूनही कुचकामी ठरली आहे़ महावितरणच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध झाला़ मात्र ही कामे ठप्प पडली आहेत़ लोकप्रतिनिधी, अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने विजेच्या समस्या कायम आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार