परभणी : पं़स़ कर्मचाऱ्याचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:15 IST2019-01-25T00:14:40+5:302019-01-25T00:15:05+5:30

गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवित २४ जानेवारी रोजी पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी कामबंद ठेवून निषेध नोंदविला़

Parbhani: The work of a pensioner stopped | परभणी : पं़स़ कर्मचाऱ्याचे काम बंद आंदोलन

परभणी : पं़स़ कर्मचाऱ्याचे काम बंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवित २४ जानेवारी रोजी पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी कामबंद ठेवून निषेध नोंदविला़
२३ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ढोकणे यांना मारहाण झाली़ त्यांना जबर मार लागला असून, या घटनेचा आम्ही निषेध करीत असल्याचे कर्मचाºयांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़ अधिकाºयांच्या घरी जाऊन पंचायत समितीच्या कामासंदर्भात मारहाण होत असेल तर आम्हा कर्मचाºयांना काय संरक्षण मिळणार, असा सवाल उपस्थित करून या घटनेमुळे आम्हा कर्मचाºयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे़ तेव्हा संबंधित दोषींविरूद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाºयांनी केली आहे़

Web Title: Parbhani: The work of a pensioner stopped