परभणी : उरुसात चोरी करणाऱ्या महिलेस पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 00:45 IST2020-02-13T00:45:08+5:302020-02-13T00:45:42+5:30
येथील ऊरुसात भाविकांच्या वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना वाढत आहेत. बुधवारी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु उशिरापर्यंत सुरु होती.

परभणी : उरुसात चोरी करणाऱ्या महिलेस पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील ऊरुसात भाविकांच्या वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना वाढत आहेत. बुधवारी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु उशिरापर्यंत सुरु होती.
शनिवारपासून येथील ऊरुसामध्ये भाविकांची गर्दी वाढली आहे. परभणी शहरासह राज्यभरातून भाविक ऊरुसासाठी दाखल झाले आहेत. याच काळात मागच्या दोन दिवसांत चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी ऊरुस परिसरात गस्त घातली. यावेळी एक महिला लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचे पदक ओढून घेत असताना पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले. या महिलेस कोतवाली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून तिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याची माहिती मिळाली.
अपघातात महिला जखमी
भरधाव जाणाºया ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एक महिला जखमी झाल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पाथरीरोडवर घडली.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन एम.एच.१८-बी.जी. १८१९ या ट्रकने जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ एका दुचाकीला धडक दिली.
या अपघातात आशामती माणिक घुले (रा.कार्ला) या जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून हेड कॉन्सटेबल राठोड याप्रकरणाचा तपास करीत आहेत.