परभणी : देशी, विदेशी दारूसह ५७ हजारांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:49 IST2019-03-28T23:49:15+5:302019-03-28T23:49:48+5:30
सोनपेठ तालुक्यातील उक्कडगाव ते परळी या रस्त्यावर एक दुचाकीवरून अवैधरीत्या दारुची वाहतूक केली जात असताना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला असून, त्यात देशी, विदेशी दारुसह ५७ हजार ७३० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़

परभणी : देशी, विदेशी दारूसह ५७ हजारांचा ऐवज जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सोनपेठ तालुक्यातील उक्कडगाव ते परळी या रस्त्यावर एक दुचाकीवरून अवैधरीत्या दारुची वाहतूक केली जात असताना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला असून, त्यात देशी, विदेशी दारुसह ५७ हजार ७३० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़
उक्कडगाव-परळी रस्त्यावरील शिवनेरी ढाबा परिसरात बुधवारी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली़ छापा टाकला त्यावेळी आरोपी शिवा सिद्राम भिसे याच्या ताब्यातून विविध कंपन्यांच्या दारू आणि बिअरच्या अनेक बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत़ याशिवाय एक दुचाकी जप्त केली असून, या दुचाकीच्या डिकीत ठेवलेल्या देशी दारुच्या ३२ बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत़ एकूण ५७ हजार ७३० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे़ या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली़