परभणी : डोक्यात दगड घालून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:35 IST2018-04-29T00:35:58+5:302018-04-29T00:35:58+5:30

कौटुंबिक वादातून रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची घटना २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गौर शिवारात घडली.

Parbhani: The wife's blood on the head | परभणी : डोक्यात दगड घालून पत्नीचा खून

परभणी : डोक्यात दगड घालून पत्नीचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा. (परभणी) : कौटुंबिक वादातून रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची घटना २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गौर शिवारात घडली.
चुडावा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौर येथील विठ्ठल जोगदंड व त्यांची पत्नी मीराबाई यांच्यात मागील काही महिन्यांपासून वाद होता. शनिवारी आखाड्यावर हा वाद उफाळून आला. त्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास पती मारहाण करीत असल्याने मीरा ही पूर्णा रस्त्यावरुन पलीकडच्या बाजुला धावत जात असताना पती विठ्ठल जोगदंड याने भर रस्त्यावर मीरा जोगदंड यांच्या डोक्यात दगड घातला. यात जबर मारहाण झाल्याने रक्तभंबाळ झालेल्या मीरा जोगदंड जागेवरच कोसळल्या व यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक मीना कर्डक, मधुकर वारकरी, नामदेव सुजलोड, सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अ
मयत महिलेच्या आईची तक्रार
या घटनेनंतर मयत महिलेच्या आईने चुडावा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती विठ्ठल जोगदंड, सासू सरस्वतीबाई जोगदंड, सासरा ग्यानोजी जोगदंड हे घर बांधण्यासाठी १ लाख रुपयांची मागणी मीरा यांच्याकडे करीत होते. त्यातूनच तिचा छळ होत होता. याच वादातून तिचा खून केल्याची तक्रार त्यांनी दिली. त्यावरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक मीना कर्डक तपास करीत आहेत.

Web Title: Parbhani: The wife's blood on the head