परभणी: हादगाव वितरिकेला आले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:54 IST2018-10-08T23:54:01+5:302018-10-08T23:54:19+5:30
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून संरक्षित पाणी हादगाव येथील ४९ व्या वितरिकेला ८ आॅक्टोबर रोजी सोडण्यात आले. विशेष म्हणजे पाणी सोडण्यासंदर्भात येथील शेतकरी आक्रमक झाले होते.

परभणी: हादगाव वितरिकेला आले पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून संरक्षित पाणी हादगाव येथील ४९ व्या वितरिकेला ८ आॅक्टोबर रोजी सोडण्यात आले. विशेष म्हणजे पाणी सोडण्यासंदर्भात येथील शेतकरी आक्रमक झाले होते.
जायकवाडीच्या डाव्या कालव्यात २६ सप्टेंबरपासून संरक्षित पाणी सोडण्यात आले आहे. २ हजार क्युसेसची मागणी असतानाही केवळ ५०० क्युसेसने या भागात पाणी येत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वितरिकांना पाणीच मिळत नाही. हादगाव बु. येथील शेतकºयांनी ४९ व्या वितरिकेवर पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जायकवाडी विभागाच्या अधिकाºयांना लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेत या वितरिकेवर ५० क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे.