शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

परभणी :गंगाखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:12 AM

तालुक्यातील नदी, नाले कोरडेठाक पडल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत जाऊन जलस्त्रोत आटले आहेत. तालुक्यातील डोंगरी भागाबरोबर गोदावरी नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : तालुक्यातील नदी, नाले कोरडेठाक पडल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत जाऊन जलस्त्रोत आटले आहेत. तालुक्यातील डोंगरी भागाबरोबर गोदावरी नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.गेल्या काही वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने नदी, नाले, लघुपाझर तलाव, गोदावरी नदी पात्र व मासोळी प्रकल्प कोरडाठाक पडत आहेत. त्यामुळे भर हिवाळ्यातच गोदावरी नदीकाठी वसलेल्या गंगाखेड शहराबरोबर तालुक्यातील गावागावांत निर्माण होत असलेल्या पाणी टंचाईमुळे भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ तालुकावासियांवर आली आहे. गत पाऊसाळ्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पर्जन्यमान झाल्याने तालुक्यातील डोंगर भागात असलेल्या गावांबरोबरच गोदावरी नदी काठी असलेल्या गावांना ही नोव्हेंबर महिन्यातच पाणी टंचाई जाणवू लागली. तालुक्यातील डोंगरी व गोदावरी नदीकाठच्या २० ते २५ गावांचा समावेश आहे. यातील बहुतांश गावांत विहीर, बोअर अधिग्रहण करण्यासारखी परिस्थिती नसल्याने तालुक्यातील खंडाळी, पडेगाव, उमलानाईक तांडा, गोदावरी तांडा आदी गावातील ग्रामस्थांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे.५४ गावांत जलस्त्रोत अधिग्रहणाची मागणीतालुक्यातील मालेवाडी, कासारवाडी, सुरळवाडी, गोदावरीतांडा, ढवळकेवाडी, कौडगाव, धरमनगरी, मरगीळवाडी, डोंगरगाव, डोंगरजवळा, वागदेवाडी, कोद्री, हरंगुळ, उंडेगाव, भगवानबाबा वस्ती, सिरसम, कर्लेवाडी, देवकतवाडी, खादगाव, वागदरा, वागदरातांडा, टाकळवाडी, खोकलेवाडी, मरडसगाव, बोर्डा, देवलानाईक तांडा, तांदुळवाडी, खोकलेवाडी, हनुमानवस्ती, उंबरवाडी, रुस्तुमनाईक तांडा, उंबरवाडी तांडा, मानकादेवी, पडेगाव, डुमनरवाडी, खंडाळी, राणीसावरगाव, पांगरी, चिमानाईक तांडा, लिंबेवाडी, धनगरमोहा, कातकरवाडी, गौडवाडी, गौळवाडी तांडा, ढेबेवाडी, गोपा, पांढरगाव, मानकादेवी, गोदावरीतांडा, खंडाळी, पडेगाव, उमलानाईक तांडा, नरळद, खळी या ५४ गावांनी विहीर व बोअर अधिग्रहणाबरोबर टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी तालुका प्रशासनाकडे केली आहे.ग्रामस्थांना लिकेज व्हॉल्वच्या पाण्याचा आधार४गोदावरी नदी काठावरील खळी गावातील विहिरीची ही पाणी पातळी खालावल्याने टाकीत पाण्याचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे खळी पुनर्वसन येथील ग्रामस्थांना गावापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पाईपलाईनच्या लिकेज झालेल्या व्हॉल्वमधून गळतीद्वारे येणारे पाणी भरून आपली तहान भागवावी लागत आहे.४गावातील पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी बालाजी गौरशेटे, अंबादास पिसाळ, महादेव गात, लिंबाजी गरड, वैजनाथ बिडगर, शेषराव धाकपाडे, प्रकाश झुरे, अमृत कचाले, पांडुरंग गात, मोकिंद सोळंके, सुधाकर गरड, मारोती पिसाळ, रामकिशन पिसाळ आदींनी तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनात केली आहे.पाण्याअभावी १५ नळयोजना बंदलोकमत न्यूज नेटवर्कसेलू : जमिनीतील पाणी पातळी झपाट्याने कमी होत असून पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्या ठाक पडत असल्याने तालुक्यातील १५ गावांतील नळ योजना बंद पडल्या आहेत.तालुक्यात नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाई निर्माण झाली होती. मार्च महिन्यात अधिकच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही गावांतील पाणी पुरवठा योजना मोडकळीस आल्या आहेत. तर काही गावातील योजना कालबाह्य झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीला कसरत करावी लागत आहे. तालुक्यातील वाकी, तांदूळवाडी, कुपटा, म्हाळसापूर, निपाणी टाकळी, डासाळा या गावातील पाणी पुरवठा करणाºया विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाणीपुरवठा योजनाही कालबाह्य झाल्याने या गावातील ग्रामस्थांना हातपंप व इतर पाणी स्त्रोतावरून तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. डिग्रस खु., डिग्रसवाडी येथील नळयोजना किरकोळ दुरूस्ती अभावी बंद आहे. तर गोहेगाव व हिस्सी येथील योजना पाणी नसल्याने बंद पडली आहे. कवडधन, शिंदे टाकळी, गव्हा येथील जलस्त्रोत कोरडे पडले असून योजना कालबाह्य झाली आहे. दरम्यान, पाणी पुरवठा करणाºया विहिरी कोरड्या पडत असल्याने पाणी असलेले स्त्रोत अधिग्रहण करून १० गावातील ग्रामस्थांची तहान भागविणाचा प्रयत्न केला जात आहे. तसेच ४ गावांतील टँकरचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ