परभणी : जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:57 IST2018-12-28T23:57:20+5:302018-12-28T23:57:37+5:30
शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी त्रिधारा पाटी परिसरात शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.

परभणी : जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी त्रिधारा पाटी परिसरात शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.
परभणी शहराला राहटी बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी अद्यापही जुन्याच पाईपलाईनचा वापर केला जात आहे. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास त्रिधारा पाटी परिसरात जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास मनपा कर्मचाºयांनी पाणीपुरवठा बंद केला. दिवसभर दुरुस्तीचे काम सुरु होते, ते पूर्ण मात्र होऊ शकले नाही.