परभणी : शासकीय मुरुमाचा सर्रास रस्त्यासाठी वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:34 PM2019-10-19T23:34:49+5:302019-10-19T23:38:36+5:30

जिल्हा प्रशासनाकडे कोणतीही परवानगी न घेता परभणी ते गंगाखेड या राष्टÑीय महामार्गासाठी सर्रास जायकवाडी कालव्याच्या परिसरातील हजारो ब्रास मुरुम वापरला जात असून, शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात असताना अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

Parbhani: The use of government acne for the road | परभणी : शासकीय मुरुमाचा सर्रास रस्त्यासाठी वापर

परभणी : शासकीय मुरुमाचा सर्रास रस्त्यासाठी वापर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा प्रशासनाकडे कोणतीही परवानगी न घेता परभणी ते गंगाखेड या राष्टÑीय महामार्गासाठी सर्रास जायकवाडी कालव्याच्या परिसरातील हजारो ब्रास मुरुम वापरला जात असून, शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात असताना अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
परभणी ते गंगाखेड या राष्टÑीय महामार्गाच्या निर्मितीचे काम मागील वर्षभरापासून सुरू करण्यात आले आहे. रस्ता रुंदीकरण करुन त्याचे मजबुतीकरण केले जात आहे. या संपूर्ण रस्त्याचे खोदकाम करुन त्यात मुरुम भरुन दबई करणे अपेक्षित आहे.
या रस्त्याच्या निर्मितीचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. रस्त्याच्या बांधणीसाठी खोदकामही करण्यात आले. मात्र खोदकाम केलेल्या जागेत मुरुम टाकण्यासाठी शासनाची रीतसर परवानगी घेऊन आणि स्वामित्वाची रक्कम भरुन मुरुम टाकणे अपेक्षित असताना कंपनीचे अधिकारी कोणतीही परवानगी न घेता परभणी जिल्ह्यातून जाणाºया जायकवाडी डाव्या कालव्याच्या परिसरातील मुरुम सर्रास उचलून नेत आहेत.
बोरवंड ते उमरी फाटा असे साधारणत: ३ कि.मी. अंतराचे खोदकाम करुन त्यात जायकवाडी कालव्यालगतचा सुमारे ३ हजार ब्रास मुरुम या रस्त्याच्या कामासाठी टाकला जात आहे.
मुरुम, माती किंवा इतर कोणत्याही गौण खनिजाचा उपसा करण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन स्वामीत्व रक्कम (रॉयल्टी) भरणे आवश्यक असताना सर्रास हा मुरुम उचलला जात असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मातीमिश्रत मुरुमाचा वापर
परभणी तालुक्यातील सिंगणापूर, बोरवंड या परिसरातील गावांतून जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या बाजूचा हा मुरुम उचलला जात आहे. विशेष म्हणजे मातीमिश्रित असलेला हा मुरुम रस्त्याच्या कामासाठी वापरला जात आहे. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपूर्वीचा हा जुना मुरुम असून, त्याच्या दर्जाविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Web Title: Parbhani: The use of government acne for the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.