शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

परभणीतील प्रकार : पाण्याअभावी २० नेत्र शस्त्रक्रिया रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:06 IST

शहरातील मुख्य नेत्र रुग्णालयात पाणी नसल्याने २० रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया रद्द करण्याचा प्रकार बुधवारी घडला असून या प्रकाराबाबत या विभागाच्या अधिकाऱ्यांना ना खंत ना गांभीर्य वाटत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील मुख्य नेत्र रुग्णालयात पाणी नसल्याने २० रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया रद्द करण्याचा प्रकार बुधवारी घडला असून या प्रकाराबाबत या विभागाच्या अधिकाऱ्यांना ना खंत ना गांभीर्य वाटत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार गेल्या अनेक काही महिन्यांपासून ढेपाळला आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी असलेल्या विविध यंत्र सामुग्री बंद असल्याने त्यांना खाजगी ठिकाणाहून सोनोग्राफी, सिटी स्कॅन, एक्स-रे आदी काढून आणावे लागत आहेत. शिवाय काही औषधीही खाजगी दुकानातूनच आणाव्या लागत आहेत. यासंदर्भात सातत्याने ओरड होत असताना वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत आणि लोकप्रतिनिधीही पाहण्यास तयार नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. या गैरसोयीचा कळस बुधवारी नेत्र रुग्णालयातही गाठला गेला. शहरातील शनिवार बाजार भागात स्वतंत्ररित्या नेत्र रुग्णालय कार्यरत आहे. या नेत्र रुग्णालयात बुधवारी शस्त्रक्रियेसाठी २० रुग्णांना येण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध भागातून हे रुग्ण सकाळपासूनच शस्त्रक्रियेसाठी आले होते; परंतु, रुग्णालयात पाणीच नव्हते. त्यामुळे अधिकारीही फिरकले नाहीत. परिणामी येथील वैद्यकीय अधिकाºयांच्या कक्षाला कुलूप दिसून आले. ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांनी वैद्यकीय अधिकारी आता येतील, थोड्या वेळाने येतील म्हणून प्रतीक्षा केली; परंतु, कोणीही येत नसल्याने काही रुग्णांच्या नातेवाईकांनी संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, शहराध्यक्ष अरुण पवार, जनहित मदत केंद्राचे कुणाल गायकवाड, प्रेम आवचार यांना फोन केला. त्यानंतर ते दुपारी १ वाजेच्या सुमारास या रुग्णालयात आले. यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांकडे चौकशी केली असता नेत्र रुग्णालयात महानगरपालिकेकडून पाणी उपलब्ध करुन देण्यात आले नसल्याने बुधवारच्या शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर शिंदे यांनी मनपातील पाणीपुरवठा विभागातील कर्मचाºयांशी संपर्क साधला असता या विभागाचे कर्मचारी हरकळ यांनी नेत्र रुग्णालयाकडून पाण्याचे बिल मनपाला दिले जात नाही. यापूर्वीचेही बिल थकित आहे. जोपर्यंत नेत्र रुग्णालयातून पावती दिली जाणार नाही, तोपर्यंत पाण्याचे टँकर पाठवू नका, अशा लेखी सूचना नेत्र रुग्णालयातील अधिकाºयांनीच मनपाला दिल्या आहेत. बुधवारी टँकर हवे, अशी कोणतीही पावती मनपाकडे आली नाही. त्यामुळे बुधवारी पाण्याचे टँकर पाठविले नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयातील अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी या संदर्भात ‘लोकमत’कडे तक्रार केली. त्यानंतर सदर प्रतिनिधीने नेत्र रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी केली असता तक्रारीत तथ्य असल्याचे दिसून आले.यावेळी उपस्थित पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील रुग्ण मंदुबाई आश्रोबा वाघमारे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी मी सकाळपासूनच शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात आले आहे; परंतु, डॉक्टरच आले नाहीत, असे सांगितले. तर परभणीतील मुन्नाबी शेख नूर यांनीही शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात हजर झाले; परंतु, डॉक्टर आले नसल्याचे सांगितले. पालम तालुक्यातील चाटोरी येथील विश्वनाथ श्रीरंग गव्हाणे यांनीही यावेळी या रुग्णालयाची तक्रार केली.दरम्यान, वैद्यकीय अधिकाºयाची बराचवेळ वाट पाहिल्यानंतर ते येणार नसल्याची खात्री झाल्यानंतर दुपारनंतर हे रुग्ण निघून गेले. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. वरिष्ठांचे लक्ष नाही. त्यामुळेच येथील अधिकारी बेजबाबदार झाल्याचा आरोप संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे यांनी केला आहे.नेत्र रुग्णांची सातत्याने हेळसांडशहरातील शनिवार बाजार भागात नेत्र रुग्णालय आहे. नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या रुग्णांना विविध तपासण्या करण्यासाठी दूर अंतरावरील जिल्हा रुग्णालयात जावे लागते.४ दोन ते तीन वेळा त्यांच्या यासाठी चकरा होतात. यातून त्यांची बरीच हेळसांड होते. शिवाय वैद्यकीय अधिकारी अनेक वेळा उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे रुग्णांना अनेक वेळा परत जावे लागते, अशी प्रतिक्रिया येथील रुग्णांनी दिली.नेत्ररोग तज्ज्ञ अर्चना गोरे यांचा प्रतिसाद नाहीया संदर्भात नेत्र रुग्णालयातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.अर्चना गोरे यांच्याशी दिवसभरात तीन वेळा मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पुन्हा चौथ्यांदा फोन केल्यानंतर त्यांनी मोबाईल घेतला; परंतु, या विषयासंदर्भात काहीही प्रतिक्रिया न देता फोन कट केला. त्यामुळे त्यांची या संदर्भातील भूमिका समजू शकली नाही.रुग्णांवर गुरुवारी शस्त्रक्रिया होणार - डाके४या संदर्भात प्रतिक्रियेसाठी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रकाश डाके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बुधवारच्या शस्त्रक्रिया पाणी नसल्याने रद्द झाल्या असून त्या गुरुवारी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटलWaterपाणी