परभणी : मोटारसायकल चोरणारे दोन आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:13 IST2018-10-31T00:12:37+5:302018-10-31T00:13:14+5:30
मोटारसायकलची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २९ आॅक्टोबर रोजी ताब्यात घेतले आहे़ या पथकाकडून एक मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे़

परभणी : मोटारसायकल चोरणारे दोन आरोपी गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मोटारसायकलची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २९ आॅक्टोबर रोजी ताब्यात घेतले आहे़ या पथकाकडून एक मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे़
जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता़ जिंतूर येथील विज्ञान चांदोजी मुळे यांची एमएच २२ ई/६८१४ या क्रमांकाची दुचाकी २६ सप्टेंबर रोजी चोरीला गेला होती़ दरम्यान परभणीतील चोरी, घरफोड्या प्रकरणांमधील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने एक पथक स्थापन केले होते़ २९ आॅक्टोबर रोजी या पथकाने दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले़ शेख मतीन शेख रशिद (१९, रा़ झमझम कॉलनी, जिंतूर) आणि शेख इम्रान शेख इस्माईल (२२, रा़ दादा शरिफ चौक, जिंतूर) अशी या व्यक्तींची नावे आहेत़
दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा जिंतूर शहरातील प्रिया बारसमोरून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली़ त्यांच्याकडून ही मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे़
दोन्ही आरोपींना जिंतूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले़ ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, श्याम काळे, जमीर फारुखी, शंकर गायकवाड, शेख ताजोद्दीन यांनी केली़