परभणी : दोन अपघातांत दोघे जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:45 IST2019-01-26T00:45:32+5:302019-01-26T00:45:41+5:30
जिंतूर तालुक्यात आॅटोरिक्षाला अपघात होऊन एक महिला ठार झाली असून, पाथरी तालुक्यात टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे.

परभणी : दोन अपघातांत दोघे जण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर/पाथरी (परभणी) : जिंतूर तालुक्यात आॅटोरिक्षाला अपघात होऊन एक महिला ठार झाली असून, पाथरी तालुक्यात टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे.
जिंतूर तालुक्यातील आंगलगाव येथून धान्य व प्रवासी घेऊन येणाऱ्या आॅटोरिक्षाचा (क्रमांक एम. एच. २२ व्ही. १०७८) मानकेश्वर गावाजवळ रॉड तुटला आणि हा आॅटोरिक्षा पलटी झाला. या अपघातात द्वारकाबाई शंकर जाधव (रा. आंगलगाव, वय ५८ वर्षे) या जागीच ठार झाल्या आहेत. तसेच रुद्राक्ष संतोष जाधव (वय ६ वर्ष ) व अर्जून बबन पवार (वय ५०) हे दोघे जखमी झाले आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी परभणी येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
टेम्पो-दुचाकी अपघातात एक ठार
पाथरी- पाथरी ते बाभळगाव या रस्त्यावर टेम्पो व दुचाकीची जोराची धडक होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातात पाथरी शहरातील माळीवाडा येथील रहिवासी काशिनाथ नारायण राऊत यांचा मृत्यू झाला.