परभणीत कडब्याने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 11:25 IST2018-03-31T00:03:41+5:302018-03-31T11:25:52+5:30

Parbhani took bitter stomach | परभणीत कडब्याने घेतला पेट

परभणीत कडब्याने घेतला पेट

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ट्रॅक्टरमधून नेण्यात येणाऱ्या कडब्याला अचानक आग लागल्याची घटना ३० मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. अग्नीशमन दलाने ही आग विझविली. मात्र तोपर्यंत संपूर्ण कडबा जळून खाक झाला.
परभणी शहरातील कृषी विद्यापीठातून पिंगळी गावाकडे एक ट्रॅक्टर कडबा घेऊन जात होता. पिंगळीकडे जात असतानाच विद्यापीठ परिसरातच ट्रॅक्टरमधील कडब्याने अचानक पेट घेतला. त्यामुळे एकच धावपळ झाली.
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर ही माहिती अग्नीशमन दलास देण्यात आली. अग्नीशमन दलातील कर्मचाºयांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत संपूर्ण कडबा जळून खाक झाला. या घटनेत ट्रॅक्टरचेही आगीने नुकसान झाले आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

Web Title: Parbhani took bitter stomach