परभणी : जुगार खेळणाऱ्या तिघांना जिंतूर शहरात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 00:01 IST2019-07-02T00:00:03+5:302019-07-02T00:01:07+5:30
जिंतूर शहरातील गणपती मंदिरासमोर एका ओट्यावर जुगार खेळणाºया तिघांविरुद्ध पोलिसांनी १ जुलै रोजी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास कारवाई केली आहे.

परभणी : जुगार खेळणाऱ्या तिघांना जिंतूर शहरात पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिंतूर शहरातील गणपती मंदिरासमोर एका ओट्यावर जुगार खेळणाºया तिघांविरुद्ध पोलिसांनी १ जुलै रोजी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास कारवाई केली आहे.
जिंतूर शहरातील गणपती मंदिर परिसरात असलेल्या एका बंद दुकानाच्या समोरील ओट्यावर बसून जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सोमवारी या भागात छापा टाकला त्यावेळी दिलीप वैजनाथ सोमोसे, लक्ष्मण वैजनाथ सोमेसे हे दोघे जण जुगार खेळवत असताना आढळून आले. पोलिसांनी दिलीप सोमेसे याच्या ताब्यातून १ हजार ३६० रुपये आणि एक मोबाईल तर लक्ष्मण सोमेसे याच्या ताब्यातून १ हजार १८० रुपये आणि एक मोबाईल असा ५ हजार २४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या दोन मटका एजंटासह मालक सुरेश जैस्वाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एच.जी.पांचाळ, सखाराम टेकुळे, हनुमंत कच्छवे, घनसावंत, अतुल कांदे, जगदीश रेड्डी, पूजा भोरगे, गजेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली.