Parbhani: Thickly covered with 2 wheels in the bed | परभणी : पाथरीत ७ दुचाकीसह चोरटा जेरबंद
परभणी : पाथरीत ७ दुचाकीसह चोरटा जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पाथरी शहरात चोरीच्या दुचाकी विक्री करीत असताना एका चोरट्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ११ नोव्हेंबर रोजी जेरबंद केले आहे़ त्याच्याकडून चोरीच्या ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेतील कर्मचारी मंगळवारी फरार आरोपींचा शोध घेत असताना चोरी प्रकरणातील एक आरोपी पाथरी येथील बसस्थानक परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ पोलिसांनी बसस्थानक परिसरात छापा टाकला़ तेव्हा आरोपी गणेश काशीनाथ गायकवाड (रा़ बांदरवाडा, ता़ पाथरी) हा चोरीची मोटारसायकल विक्री करीत असताना मिळून आला़
ही मोटारसायकल त्याने मंठा येथून चोरल्याची कबुली दिली़ अधिक चौकशी केली असता, गणेश गायकवाड याने मंठा, परतूर, मानवत, सेलू येथून काही मोटारसायकल चोरल्या असल्याचे स्पष्ट झाले़ त्यामुळे आरोपीला विश्वासात घेवून चौकशी केली असता, सेलू शहरातून चोरलेली मोटारसायकल जवळा झुटा येथील अंगद आश्रोबा जुटे यास विक्री केल्याचे समोर आले़
पोलिसांच्या पथकाने अंगद जुटे यासही सेलू कॉर्नर येथून ताब्यात घेतले आहे़ या आरोपीकडून पोलिसांनी एकूण ७ दुचाकी जप्त केल्या आहेत़ त्या सेलू पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या़ जप्त केलेल्या दुचाकींची किंमत १ लाख ३७ हजार रुपये एवढी आहे़ या प्रकरणी गणेश गायकवाड आणि अंगद जुटे यांना सेलू पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेकाँ सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, पोलीस नाईक जमीर फारुखी, शंकर गायकवाड, अरुण कांबळे यांनी केली़
८ गुन्ह्यांची उकल
४आरोपी गणेश गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एकूण ८ गुन्ह्यांची उकल झाली आहे़
४सेलू, मानवत, मंठा, परतूर, जालना या पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेले मोटारसायकल चोरीचे गुन्हे यामुळे उघडकीस आले आहेत़

Web Title: Parbhani: Thickly covered with 2 wheels in the bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.