परभणी : ‘राहाटी’त २० दिवसांचाच साठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:25 AM2018-11-26T00:25:33+5:302018-11-26T00:25:57+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहाटी येथील बंधाºयात केवळ २० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला असून, पुढील पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी लवकरच पाण्याचे आवर्तन मनपाला घ्यावे लागणार आहे.

Parbhani: There is only 20 days left in 'Rahati' | परभणी : ‘राहाटी’त २० दिवसांचाच साठा शिल्लक

परभणी : ‘राहाटी’त २० दिवसांचाच साठा शिल्लक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहाटी येथील बंधाºयात केवळ २० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला असून, पुढील पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी लवकरच पाण्याचे आवर्तन मनपाला घ्यावे लागणार आहे.
राहाटी बंधाºयातून परभणीकरांना पाणीपुरवठा केला जातो. या बंधाºयामध्ये दरवर्षी सिद्धेश्वर प्रकल्पातून पाणी घेतले जाते. मात्र यावर्षी या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सिद्धेश्वर बंधाºयातून चार आणि निम्न दुधना प्रकल्पातून दोन पाणी पाळ्या मंजूर झाल्या आहेत. या दोन्ही प्रकल्पांमध्ये परभणीकरांसाठी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यावर्षी पाण्याची टंचाई वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाबरोबरच नागरिकांनाही जपून पाणी वापरावे लागणार आहे.
परभणी शहरासाठी पुढील वर्षीच्या जून महिन्यापर्यंतचे पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. या आरक्षण कोट्यातून ३ नोव्हेंबर रोजी पहिली पाणी पाळी सिद्धेश्वर प्रकल्पातून घेण्यात आली होती. राहाटी बंधाºयाची पाणी साठवण क्षमता १.५ दलघमी असून, एका पाणी पाळीतून मिळालेले पाणी साधारणत: दीड महिना शहरवासियांना पुरणार आहे. सध्या बंधाºयातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला असता आणखी २० दिवस पुरेल एवढा साठा बंधाºयात शिल्लक आहे. त्यामुळे येत्या एक-दोन आठवड्यातच मनपाला पुढील पाणी पाळीचे नियोजन करावे लागणार आहे. प्रत्येक पाणी पाळीच्या वेळी सुमारे ८ दलघमी पाणी प्रकल्पातून सोडावे लागते, तेव्हा कुठे बंधाºयात दीड दलघमी पाणीसाठा जमा होतो. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आव्हानही मनपासमोर उभे टाकले आहे.
दहा दिवसांतून एक वेळा पाणी
परभणी शहरात सध्या अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा योजना सुमारे ३० वर्षांपूर्वीची आहे. शहराच्या लोकसंख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे या पाणीपुरवठा योजनेद्वारे संपूर्ण शहराला पाणी पुरविताना मनपाला कसरत करावी लागते. पाणीटंचाई नसतानाही शहराला ८ ते ९ दिवसांतून एक वेळा पाणी येत होेते. आता १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. एक वेळा पाणी सोडल्यानंतर तीन ते चार तास नळांना पाणी राहते. तीन ते चार तास पाणी सोडले तरच ते प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचते. दरम्यान, शहरात पाण्याचा अपव्यय देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक भागामध्ये नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे पाणी भरणे झाल्यानंतर नळावाटे पाण्याचा अपव्यय होतो. सर्व नळजोडण्यांना तोट्या बसविणे बंधनकारक केल्यास होणारा पाण्याचा अपव्यय टळू शकतो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिकेला आता कडक धोरण राबवावे लागणार आहे.

Web Title: Parbhani: There is only 20 days left in 'Rahati'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.