शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

परभणी : हमीभाव केंद्राकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 01:06 IST

तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्राने ७५४ शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माल विक्रीसाठी आणण्याच्या सूचना देऊनही केवळ १७ शेतकºयांनी २५१ क्विंटल सोयाबीनची या केंद्रावर विक्री केली आहे. दुसरीकडे डिसेंबरअखेरपर्यंत तब्बल ३५ हजार क्विंटल सोयाबीन खाजगी व्यापाºयांना शेतकºयांनी विक्री केला आहे. त्यामुळे हमीभाव मिळत असतानाही शेतकºयांनीच या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी ) : तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्राने ७५४ शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माल विक्रीसाठी आणण्याच्या सूचना देऊनही केवळ १७ शेतकºयांनी २५१ क्विंटल सोयाबीनची या केंद्रावर विक्री केली आहे. दुसरीकडे डिसेंबरअखेरपर्यंत तब्बल ३५ हजार क्विंटल सोयाबीन खाजगी व्यापाºयांना शेतकºयांनी विक्री केला आहे. त्यामुळे हमीभाव मिळत असतानाही शेतकºयांनीच या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.तालुक्यातील १५ हजार ८३१ हेक्टरवर सोयाबीन आणि २ हजार ४२९ हेक्टरवर मुगाचा पेरा होता. खरीप हंगामाच्या सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने सोयाबीनचे उत्पादन वाढेल, असे दिसून येत होते. मात्र पीक हाताला आले असताना पावसाने खंड दिल्यामुळे पिकांनी माना टाकणे सुरू केले होेते. याचा परिणाम सोयाबीन उत्पादनावर झाला होता. मानवत तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकºयांजवळील सोयाबीन शासकीय हमीभाव दरात खरेदी करण्यासाठी तालुका खरेदी विक्री संघाकडे सुमारे ७५४ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. मात्र या पैकी केवळ १७ शेतकºयांनीच आधारभूत खरेदी केंद्रावर माल विक्री करणे पसंत केले आहे. केवळ २५१ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे.शेतकºयांना निकषांची म्हणजे सर्व शेतमाल उत्तम प्रतीचा असणे, आधार कार्ड, सातबारा आदी कागदपत्रांची पूर्तता करून माल विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करूनही खरेदी सुरू होण्यास विलंब होत असल्याने शेतकरी या प्रक्रियेला कंटाळले होते. त्यातच केंद्रावर माल विक्री केल्यानंतर कष्टाच्या पैशासाठी वाट पहावी लागत असल्याने खाजगी व्यापाºयांना माल विकून अनेक शेतकरी मोकळे झाले आहेत.३४९९ रुपये हमीभाव असलेले सोयाबीन खुल्या बाजारातील आडत व्यापारी ३२०० रुपये दराने खरेदी करीत आहेत. सोयाबिनचे उत्पादन अधिक असणाºया शेतकºयांनी मात्र दर वाढेल या आशेवर अजूनही सोयाबीन घरात ठेवले आहे.खाजगी बाजारपेठेमध्ये माल विक्री केल्यानंतर शेतकºयांना पैसे नगदी मिळत असल्याने तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकºयांनी आपला माल खाजगी व्यापाºयांना विक्री केला आहे. तालुक्यात डिसेंबरअखेर ३५ हजार क्विंटलवर सोयाबीन खाजगी व्यापाºयांनी शेतकºयांकडून खरेदी केल्याची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीकडे झाली आहे.४शहरातील नवा मोंढा परिसरात तालुका खरेदी विक्री संघाने २२ आॅक्टोबर रोजी खरेदी विक्री संघामार्फत खाजगी गोदामामध्ये भाडेतत्त्वावर शासकीय हमीभाव मूग खरेदी केंद्र सुरू केले आहे.४या ठिकाणी १३ नोंव्हेंबरपर्यंत ९०० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. शासनाने जिल्हानिहाय प्रती हेक्टरी मूग, उडीद, उत्पादकतेची यादी जाहीर करून शासकीय हमीभाव योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यात हेक्टरी केवळ १ क्विटंल ८० किलो इतके मूग खरेदी करण्याची अट घातली होती.्नखाजगी व्यापारपेठच फुललीशासकीय हमीभाव केंद्र उशिराने सुरू झाले. तसेच हक्काच्या पैशांसाठी तीन-तीन महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने अनेक शेतकºयांनी खाजगी व्यापारपेठेतच माल विक्री करणे पसंत केले.

टॅग्स :parabhaniपरभणीMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी