शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शिक्षकांची समायोजन प्रक्रिया रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 23:59 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने जुलै महिन्यात राबविण्यात आलेली प्राथमिक पदवीधर शिक्षकांची जिल्हास्तरीय समूपदेशन प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या प्रक्रियेला औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने राबविलेल्या या पद्धतीमुळे ही नामुष्की ओढावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या वतीने जुलै महिन्यात राबविण्यात आलेली प्राथमिक पदवीधर शिक्षकांची जिल्हास्तरीय समूपदेशन प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या प्रक्रियेला औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने राबविलेल्या या पद्धतीमुळे ही नामुष्की ओढावली आहे.जिल्हा परिषदेच्या वतीने जुलै महिन्यात प्राथमिक पदवीधर शिक्षकांची जिल्हास्तरीय समूपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली होती. या संदर्भात १० जुलै २०१९ रोजी जि.प. मुख्य कार्यकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी आदेश काढले होते. ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. शासकीय निर्णयाप्रमाणे या बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे या प्रक्रियेमुळे शिक्षकांवर अन्याय झाला असल्याच्या कारणावरुन जिल्हा परिषद प्रशासनाच्या निर्णयाला अमरदीप रामराव मस्के व इतर ३४ प्राथमिक पदवीधर शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. औरंगाबाद खंडपीठाने या प्रक्रियेला स्थगिती दिली होती व सदरील शिक्षक विभागीय आयुक्तांकडे दाद मागविण्याऐवजी थेट न्यायालयात आल्याने त्यांना विभागीय आयुक्तांकडे जाण्यास सांगितले होते.विभागीय आयुक्त कार्यालयाने या संदर्भात २४ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने १३ फेब्रुवारी रोजी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये १० जुलै २०१९ रोजी राबविण्यात येत असलेली समायोजन प्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिक्षक मस्के व इतर ३४ जणांच्या तक्रारीच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाने सदरील प्रक्रियेला स्थगिती दिली होती. त्यामुळे ही प्रक्रिया तात्पुरती स्थगीत करुन आदेश निर्गमित केले नव्हते. यातील तीन याचिकांचे प्रकरण उच्च न्यायालयाने निर्णय देऊन समायोजन प्रक्रियेसंदर्भात आयुक्त कार्यालयाकडे अपील करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली व त्यांच्यासमोर आपली बाजू मांडली. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी या प्रकरणी जि.प. सीईओ बी.पी. पृथ्वीराज यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पृथ्वीराज यांनी अभिप्राय सादर केला. त्यानुसार १० जुलैच्या समायोजन प्रक्रियेनंतर ७ महिन्यांच्या कालावधीत पवित्र पोर्टलमार्फत १९६ शिक्षकांना पदस्थापना दिल्या आहेत. तसेच महानगरपालिकेच्या ९ अतिरिक्त शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्या आहेत.याच बरोबर चालू शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात आले असून आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमांक ४ प्रक्रिया तसेच जिल्हा बदल्याची प्रक्रियाही नजीकच्या कालावधीत होणार असून १० जुलैचे जिल्हास्तरीय समूपदेशनाच्या अनुषंगाने आदेश निर्गमित केले नाहीत. या प्रक्रियेच्या अनुषंगाने नव्याने आढावा घेणे आवश्यक असल्याने १० जुलैचे आदेश रद्द करण्यात येत असल्याचे सीईओ पृथ्वीराज यांनी या अहवालात नमूद केले आहे.तक्रारकर्त्या ३५ शिक्षकांना दिलासा४जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी जुलै महिन्यात राबविलेल्या समूपदेशन प्रक्रियेच्या विरोधात शिक्षक अमरदीप मस्के व इतर ३४ अशा एकूण ३५ शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने या प्रक्रियेला स्थगिती दिली. त्यामुळे नाईलाजाने सीईओ पृथ्वीराज यांनी ही प्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याचे आदेश काढले. तसेच तक्रारकर्त्या ३५ शिक्षकांची समूपदेशन प्रक्रिया रद्द करुन हे अपील निकाली काढण्यात यावे, असे पत्र विभागीय आयुक्तांना पाठविले आहे. त्यामुळे या ३५ शिक्षकांना आता दिलासा मिळाला आहे. सीईओ पृथ्वीराज यांच्या जुलैमधील आदेशानुसार हे शिक्षक नव्याने बदली झालेल्या ठिकाणी रुजू झाले होते. आता विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या जुन्या शाळेवर जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCourtन्यायालयTeacherशिक्षक