परभणी: गंगाखेडमध्ये तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:02 AM2019-10-13T00:02:31+5:302019-10-13T00:02:52+5:30

शहरातील आझादनगर परिसरात दोघांवर तलवारीने हल्ला केल्याची घटना १० आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. यात दोघे जण जखमी झाले असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Parbhani: Sword attack in Gangakhed | परभणी: गंगाखेडमध्ये तलवारीने हल्ला

परभणी: गंगाखेडमध्ये तलवारीने हल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): शहरातील आझादनगर परिसरात दोघांवर तलवारीने हल्ला केल्याची घटना १० आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. यात दोघे जण जखमी झाले असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील आझादनगर भागातील रहिवासी असलेले शेख वजीर शेख नजीर यांच्या भावाला काही जणांनी १० आॅक्टोबर रोजी रात्री ७.३० ते ८.३० वाजेच्या सुमारास आझादनगर परिसरातील पुलावर बोलावून घेतले. त्या ठिकाणी शेख अजहर शेख युनूस, अकबर, मोहसीन, बिलाल, गुड्डू आदींनी शेख वजीर यांच्या भावाला शिवीगाळ केली.
याच वेळी शेख वजीर हे घटनास्थळी पोहोचले असताना वरील आरोपींनी तलवारीने त्यांच्या डोक्यात वार केला. यामुळे ते गंभीर जखमी झाले. तसेच शेख वजीर यांच्या भावालाही तलवार, लोखंडी रॉड व पाईपने मारहाण करण्यात आली. शेख वजीर आणि त्यांच्या भावास तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. परभणी येथे उपचार घेत असलेल्या शेख वजीर शेख नजीर यांनी ११ आॅक्टोबर रोजी रात्री जवाब दिला. त्यात वरील पाच आरोपींनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. त्यावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच हत्यार प्रतिबंधक कायदा, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आदी कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेंडके तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलीस पळविले
४गंगाखेड- अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याची घटना ९ आॅक्टोबर रोजी पोखर्णी वाकळे येथे घडली असून या प्रकरणी एका युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
४पोखर्णी वाळके येथील मुंजाजी रावण पंडित (२२) याने ९ आॅक्टोबर रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास १७ वर्षीय मुलीस फूस लावून पळविल्याची तक्रार अपहृत मुलीच्या मामाने गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरुन मुंजाजी पंडित याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड तपास करीत आहेत.

Web Title: Parbhani: Sword attack in Gangakhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.