परभणी : दीड एकरवरील ऊस आगीत जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:53 IST2019-03-30T00:53:24+5:302019-03-30T00:53:32+5:30
तालुक्यातील खळी शेत शिवारातील उसाच्या शेतात २९ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दीड एकर क्षेत्रावरील ऊस व स्प्रिंक्लरचे पाईप जळून खाक झाल्याची घटना घडली.

परभणी : दीड एकरवरील ऊस आगीत जळून खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : तालुक्यातील खळी शेत शिवारातील उसाच्या शेतात २९ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दीड एकर क्षेत्रावरील ऊस व स्प्रिंक्लरचे पाईप जळून खाक झाल्याची घटना घडली.
तालुक्यातील खळी शेतशिवारात असलेल्या रमेश माधवराव पवार यांच्या सर्व्हे नं. २५८ क्रमांकाच्या शेत जमिनीत असलेल्या दीड एकर उसाला शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक लाग लागली.
आगीची माहिती समजताच शेतात असलेल्या सालगड्यांसह लिंबाजी दसवंते, रमेश पवार, शंकर व्होरे, रामेश्वर पवार, कल्याण पवार, मारोती पवार, वचिष्ठ पवार आदींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु, आग विझेपर्यंत दीड एकर वरील ऊस व स्प्रिंक्लरचे १० पाईप जळाले. यात ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे रमेश पवार यांनी तहसील कार्यालयात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.