शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

परभणी, पाथरीत अचानक तपासणी;पाच दुकानमालकांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:29 PM

दुकानातील व्यवहारांची नोंद ठेवली जात नसल्याच्या कारणावरुन दहशतवाद विरोधी पथकाने परभणी व पाथरी येथील पाच दुकानमालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुकानातील व्यवहारांची नोंद ठेवली जात नसल्याच्या कारणावरुन दहशतवाद विरोधी पथकाने परभणी व पाथरी येथील पाच दुकानमालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.येथील दहशतवाद विरोधी पथकाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून घरमालक, लॉज मालक, सायबर कॅफे मालक, मोबाईल सीम विक्रेते, भंगार विक्रेते, प्रिटींग प्रेस चालक, विस्फोटक गोदाम परवानाधारक आदींची तपासणी केली जात आहे. त्यांच्याकडून खरेदी- विक्री व्यवहारांच्या नोंदीची पडताळणी केली जात आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली, २१ आॅगस्ट रोजी पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांच्या नेतृत्वाखाली सपोउपनि.शेख इब्राहीम, भारत नलावडे, दत्तात्रय चिंचाणे, अजहर पटेल, आरेफ कुरेशी, दीपक मुदिराज यांच्या पथकाने परभणीतील जिंतूररोड भागातील गुडलक अ‍ॅटो कन्सल्टींग या दुचाकी खरेदी-विक्री दुकानाची तपासणी केली. त्यावेळी सदरील वाहने कोणाकडून खरेदी केली, त्या वाहनांच्या कागदपत्रांच्या नोंदी आदी बाबतही माहिती या पथकाला आढळून आली नाही. त्यामुळे दुकान मालक सय्यद इस्माईल यांच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ आॅगस्ट रोजी पाथरी येथील सेलू कॉर्नर जवळील लॉजची तपासणी केली असता त्यांच्याकडेही ग्राहकासंदर्भातील नोंदी आढळून आल्या नाहीत. त्यामुळे मॅनेजर मारोती कोकाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. जि.प. शाळा मैदानाजवळील रौफ स्क्रॅप भंगार दुकानाची तपासणी केली असता तेथेही नोंद आढळून आल्या नाहीत. त्यामुळे रौफ अन्सारी यांच्यावर गुन्हा दाखल केला. येथीलच साई मंदिर रस्त्यावरील खलील स्क्रॅप दुकान, लोकसेवा स्क्रॅप दुकान या दोन्ही दुकानांची तपासणी केली असता या दुकानातही नोंदीचा अभाव आढळून आला. त्यामुळे मालक खलील चाँद शाह व शोएब अहेमद यांच्यावर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.पावणे दोन लाखांचा गुटखा, पानमसाला केला जप्त४पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ आॅगस्ट रोजी विशेष मोहीम राबवून १ लाख ८२ हजार ६७६ रुपयांचा गुटखा व पानमसाला पाच ठिकाणी टाकलेल्या छाप्यात जप्त केला.४परभणीतील गंगाखेड रोड भागातील फरीद कॉलनी येथे शेख फारुख शेख जिलानी याच्या घरावर छापा टाकला असता तेथे आरएमडी, वजीर, गोवा, एनपी, जाफराणी जर्दा, राजनिवास पानमसाला, विमल पानमसाला आदींचा ८६ हजार २२९ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी शेख फारुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.४रवळगाव येथे अशोक काशिनाथ राऊत याच्या राहत्या घरी २० हजार ४०० रुपयांचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.४परभणीतील वसमत रोडवरील आरोपी प्रकाश विठ्ठल भालेराव यांच्या श्री विठ्ठल जर्दा स्टोअर या दुकानात ६ हजार ११२ रुपयांचा सुगंधित तंबाखू, पानमसाला आढळून आला. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.४सोनपेठ येथील आरोपी सखाराम वाकेकर याच्या मोटारसायकलवर ६ हजार ६६० रुपयांचा गुटखा, सुगंधित सुपारी आदी मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी सोनपेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.४परभणीतील शंकरनगर भागात आरोपी शेख सादिक, शेख मुक्तार याच्या राहत्या घरी २३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. त्याच्यावर मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.४परभणीतील शेख शोएब शेख आयुब याच्या घरी तर शेख रियाज शेख फरीदमियाँ याच्या पानटपरीत एकूण १४ हजार ५८५ रुपयांचा गुटखा, तंबाखू, पानमसाला आढळून आला. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.४ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर अधीक्षक रागसुधा आर व पोनि. प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुनील गोपीनवार, प्रकाश कापुरे, किशोर नाईक, प्रकाश कच्छवे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी