परभणी : सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 01:06 IST2019-02-20T01:06:21+5:302019-02-20T01:06:43+5:30
नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील यांनी परिक्षेत्रातील १८ पोलीस अधिकाºयांच्या बदल्या केल्या असून, त्यामध्ये परभणीतील सहा पोलीस अधिकाºयांचा समावेश आहे़

परभणी : सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील यांनी परिक्षेत्रातील १८ पोलीस अधिकाºयांच्या बदल्या केल्या असून, त्यामध्ये परभणीतील सहा पोलीस अधिकाºयांचा समावेश आहे़
लोकसभा निवडणुकीनिमित्त निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये परभणी येथील नानलपेठचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांची नांदेड येथे तर नवा मोंढा येथील नरसिंग ठाकूर यांची लातूर येथे बदली करण्यात आली आहे़ पालम येथील महेश शर्मा यांचीही लातूर येथे तर गंगाखेड येथील सोहन माच्छरे यांची नांदेड येथे बदली करण्यात आली आहे़ सोनपेठ येथील सोपान सिरसाठ यांची लातूर येथे तर पूर्णा येथील अशोक घोरबांड यांची हिंगोली येथे बदली करण्यात आली आहे़ परभणी येथे नांदेडहून वसुंधरा बोरगावकर, सुभाष राठोड, रमेश स्वामी, गजानन सैंदाने, लातूर येथून गोवर्धन भुमे, दीपक शिंदे आणि रामेश्वर तट यांची बदली करण्यात आली आहे़ या संदर्भातील आदेश १८ फेब्रुवारी रोजी काढण्यात आले आहेत़